गोल पोस्ट गुन्हा तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

रत्नागिरी : मालवणमधील सुकळवाड बाजारपेठ येथे एका तरुणाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नागेश भोगटे (वय ३०) असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप भोगटे याचे सहा महिन्यांपूर्वी लग्न झाले होते.
नागेशचा त्यानंतर काही महिन्यांनी त्याचा घटस्फोट झाला होता. तो गेले काही महिने मानसिक तणावाखाली होता. रविवारी नातेवाईकांच्या लग्नासाठी त्याची आई, बहिणी अन्य कुटुंबीय गेले असता, दुपारी साडे बारा ते दीड वाजेच्या दरम्यान राहत्या घरातील एका खोलीत नायलॉन दोरीने त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली.
लग्न आटोपून घरी आलेल्या त्यांचे भावजी दत्तात्रय आळवे यांना दिलीप यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्यांची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version