गोल पोस्ट महाराष्ट्र मुंबई तरुणावर चौघांचा लैंगिक अत्याचार

तरुणावर चौघांचा लैंगिक अत्याचार

मुंबई: हॉटेलबाहेर काढलेला सेल्फी २२ वर्षाच्या मुलाला चांगलाच महागात पडलला इन्स्टाग्रामवरील ओळखत असल्याचे सांगून चार जणांनी हॉटेलबाहेरून तरुणाचे अपहरण करून त्याच्यावर कारमध्ये लैंगिक अत्याचार केला.
कुर्ला पश्चिमेकडील नवाब शीख पराठा या हॉटेलमध्ये २२ वर्षीय मुन्ना (बदललेले नाव) याने जेवण केले आणि हॉटेलबाहेर येऊन सेल्फी काढली. हॉटेलचे नाव दिसत असलेला हा फोटो त्याने इन्स्टाग्रामवर टाकला. त्याचा हा फोटो पाहू इन्स्टाग्रामवर असलेल्या दोन तरुणांनी त्याला संपर्क केला आणि त्याच ठिकाणी थांबण्यास सांगितले. काही वेळेतच हे दोघे दुचाकीवरून आले आणि मुन्ना याला मध्यभागी बसवून विद्याविहारच्या दिशेने निघाले. विद्याविहार येथील नीलकंठ बिझनेस पार्कजवळ त्याला न्हेण्यात आले. तिथे गेल्यावर मुन्ना याला एका कारमध्ये बसण्यास सांगितले गेले. त्या ठिकाणी आधीच आणखी दोघे उपस्थित होते. त्यातील एका तारूनाने कार सुरू केली आणि इतर तिघांनी धावत्या कारमध्येच मुन्ना याच्यावर लैंगिक अत्याचार केले. या नंतर त्याचा मोबाइल आणि पाकीट काढून घेतले. त्यांनी डेबिट कार्डवरून २ हजार रुपये काढून घेतले आणि दोन हजाराचे पेट्रोलही भरले. त्यानंतर त्याला कारबाहेर फेकून चौघे पसार झाले. मुन्ना याने १०० क्रमांकावर फोन केला लगोलग त्याने पालकांशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. घटनेची माहिती मिळताच घाटकोपर पोलिस घटनास्थळी पोहोचले. मात्र हा सर्व प्रकार विनोबा भावे नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने त्यांना याबाबत कळविण्यात आले. हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच विनोबा भावे नगर पोलिसांनी चार जणांना अटक केली.

error: Content is protected !!
Exit mobile version