तरुणीचे अपहरण; नग्न अवस्थेत रेल्वे रुळावर सोडले

अहमदनगर : येथे भाजी आणण्यासाठी गेलेल्या तरुनीचे अपहरण करून नंतर तिला नग्न अवस्थेत विळद परिसरातील रेल्वे रुळावर पोत्यात सोडल्याची घटना गुरूवारी(दि.२१) रोजी सायंकाळी उघडकीस आली. अशी माहिती पोलिसांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, एक २१ वर्षीय तरुणी हातपाय बांधलेल्या, तोंडाला चिकटपट्टी लावलेल्या नग्न अवस्थेत पोत्यात रेल्वे रुळावर आढळली. या तरुणीवर अत्याचार झाल्याचा संशयही प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त झाला. ही बाब स्थानिक ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी या तरुणीची पोत्यातून सुटका केली. याबाबत रात्री उशीरापर्यंत एमआयडीसी पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता.
विळद ग्रामपंचायतचे सदस्य संदीप जगताप, दगडू जगताप यांनी घटनेची माहिती एमआयडीसी पोलीसांना दिली.
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पवन हे आपल्या सहकार्‍यांसह घटनास्थळी दाखल झाले. या महिलेला पुढील उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले.
ही तरूणी गुरूवारी (दि. २१) गजानन कॉलनीत भाजी आण्यासाठी गेली होती. त्याचवेळी एका चारचाकी वाहनातून माझे अपहरण चौघांनी केल्याची माहिती या तरूणीने उपस्थितांना दिली.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा