पुणे:दोन दिवस लक्ख ऊन प्रकाशा नंतर पुण्यात काल सायंकाळी चार ते पाच या तासा भरात पडलेल्या पावसाने पुन्हा एकदा पुणे जलमय झाले. कालची सायंकाळ ही पुणेकरांना आठवडाभरा पूर्वी झालेल्या पावसाची आठवण करून देणारी होती .ज्या मुळे पुणेकरांनी धडा घेत वेळेच्या आत घरी परतण्यास सुरुवात केली. .या मुळे वाहतूक कोंडीची समस्या पुणे प्रशासना समोर पुन्हा एकदा उभे राहिलेचे चित्र दिसले .कालच्या तासाभराच्या पावसामुळे पुण्यातील म्हात्रेपूल,सिहंगड रोड ,कर्वे रस्ता ,जंगली महाराज रोड ,कात्रज, शिवाजी नगर एस टी स्टॅन्ड ,कोथरूड या भागात दीड ते दोन फूट पाण्याचे डबके पाहायला मिळाले,एकीकडे पुणे प्रशासनाचे वाहतूक कोंडी आणि डबक्याचें भोंगळ कारभार समोर येत असतानाच पावसाच्या गोंधळात पुणेकरांनी मात्र सतर्कता बाळगत घर गाठण्यास पसंती दिली .