पुणे, 25 सप्टेंबर 2021: टाटा समूहाची कंपनी Tata Advanced System लवकरच देशातील हवाई दलासाठी विमाने तयार करणार आहे. यासाठी कंपनीनं एअरबससोबत करार केलाय, ज्याची माहिती स्वतः रतन टाटा यांनी दिली होती.
विमान बनवणारी पहिली खासगी कंपनी
भारतीय हवाई दल एअरबसकडून 56 C295 विमानं खरेदी करेल. यापैकी 40 Tata Advanced Systemद्वारे तयार केले जातील, तर 16 एअरबसद्वारे ‘फ्लाई-अवे’ स्थितीत वितरित केले जातील. ही वाहतूक विमानं हवाई दलाच्या सध्याच्या AVRO विमानांच्या ताफ्याची जागा घेतील.
आतापर्यंत हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) प्रामुख्यानं हवाई दलासाठी देशांतर्गत विमान बनवण्याचं काम करत आहे. देशातील खासगी कंपनी हवाई दलासाठी विमान बनवण्याची ही पहिलीच वेळ असेल.
एअरबस C295 ची ही वैशिष्ट्ये
या कराराच्या अंमलबजावणीनंतर एअरबस 4 वर्षात हवाई दलाला 16 विमानांचा पुरवठा करेल. या विमानात एका वेळी 71 जवान किंवा 50 पॅरा ट्रूपर्स वाहून नेण्याची क्षमता आहे. एवढौच नाही तर याचा उपयोग वैद्यकीय निर्वासन, रसद, विशेष मोहिमे, आपत्ती व्यवस्थापन आणि सागरी सीमा रक्षणासाठी केला जातो. त्याची विशेष गोष्ट अशी आहे की ते लहान हवाई पट्ट्या तसेच त्या दुर्गम भागात उड्डाण करू शकतं. या सर्व विमानांमध्ये स्वदेशी इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सुइटची सुविधा असेल.
‘मेक इन इंडिया’ चा पहिला प्रकल्प
एवढेच नाही तर देशातील ही पहिलीच वेळ असेल जेव्हा एखादी खासगी कंपनी विमान निर्मितीपासून ते असेंबलिंग, टेस्टिंग आणि क्वालिफायिंग, डिलीव्हरी आणि मेंटेनन्स पर्यंत काम करेल. अशाप्रकारे, मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमात विमान निर्मिती क्षेत्राचाही हा पहिला प्रकल्प असेल.
रतन टाटा यांचं ट्विट
टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी C295 विमान बनवण्याच्या कराराबद्दल एअरबस आणि टाटाचं अभिनंदन केलं. त्यांनी ट्विट केलौ की, भारतात विमान आणि विमानचालन प्रकल्प उघडण्याच्या दिशेनं हे एक मोठे पाऊल असेल. भारतात या विमानाच्या निर्मितीमुळं देशात आंतरराष्ट्रीय स्तराची पुरवठा साखळी होईल. यामुळं मेक इन इंडिया वाढंल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे