पुणे, २२ ऑगस्ट २०२१: टाटा मोटर्सने नुकतीच आपली नवीन इलेक्ट्रिक सेडान, टाटा टिगोर ईव्ही काढली आहे. कंपनीने आपल्या या कारला ब्ल्यू शेड मध्ये सदर केले आहे. टाटा मोटर्सची ही दुसरी इलेक्ट्रिक कार असून आता तिची बुकिंगही सुरू झाली आहे. त्याबद्दल जाणून घ्या …
कंपनीने अजून अधिकृतपणे टाटा टिगोर ईव्ही लाँच केलेली नाही. तसेच तिची किंमतही जाहीर करण्यात आलेली नाही, कारण कंपनी ३१ ऑगस्ट रोजी लाँच करेल आणि त्यानंतरच कारची किंमत आणि विविध व्हेरीएंट विषयी संपूर्ण माहिती मिळेल. पण आता तिची बुकिंग किंमत आणि काही अतिशय अनोखी वैशिष्ट्ये उघड झाली आहेत.
टाटा मोटर्सच्या नेक्सन ईव्हीचा भारतातील इलेक्ट्रिक कार बाजारात ५०% पेक्षा जास्त वाटा आहे. टाटा टिगोर ईव्ही मध्ये कंपनीने आपले झिपट्रॉन तंत्रज्ञान देखील वापरून पाहिले आहे, परंतु यामध्ये कंपनीने स्टेट ऑफ द आर्ट हाई वोल्टेज इलेक्ट्रिक आर्किटेक्चर जोडले आहे जे या कारचा परफॉर्मन्स आणखी सुधारते.
टाटा मोटर्सच्या झिपट्रॉन तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य म्हणजे यात लिथियम-आयन बॅटरीला कायमस्वरूपी मॅग्नेट एसी मोटर जोडलेली आहे, जी कारला सातत्याने वीज पुरवठा पुरवते. तसेच यामुळे कारची बॅटरी पॅक देखील डस्टप्रूफ आणि वॉटरप्रूफ होते. टाटा टिगोर EV मध्ये कंपनीने २६ kWh उच्च-ऊर्जा घनतेची लिथियम-आयन बॅटरी दिली आहे. या बॅटरीवर ८ वर्षांची वॉरंटी आहे.
टाटा टिगोर EV च्या पिकअपबद्दल बोलायचे झाले तर ती फक्त ५.७ सेकंदात ६० किमी प्रतितास वेग गाठू शकते. त्याच वेळी, या कारची इलेक्ट्रिक मोटर जास्तीत जास्त ५५ kW आणि १७० Nm टॉर्क उत्पन्न करते. एवढेच नाही, ती फक्त एका तासात ० ते ८०% पर्यंत चार्ज होऊ शकते, तर घरांमध्ये बसवलेल्या १५V प्लग पॉईंटवर साडेआठ तासात ०-८०% पर्यंत चार्ज होऊ शकते.
Tata Tigor EVला अतिशय रीफाईन एक्टीरियर, तर इंटेरियर मध्ये ब्ल्यू टच देण्यात आला आहे. याबरोबरच यात ७-इंच इन्फोटेनमेंट स्क्रीन, ४ स्पीकर्स आणि ३० हून अधिक वैशिष्ट्ये आहेत, जे ZConnect अॅपद्वारे चालतात. Tata Tigor EV फक्त २१,००० रुपयांमध्ये बुक करता येऊ शकते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे