नवी दिल्ली ३० जुलै २०२० : दिल्लीत डिझेलवरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) ३० टक्क्यांवरून १६.७५ टक्के करण्यात आला आहे.अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गुरुवारी हा निर्णय घेतला.
केजरीवाल यांनी पत्रकारांना बोलताना सांगितले.की दिल्ली मंत्रिमंडळाने डिझेलवरील व्हॅट ३० टक्क्यांवरून १६.७५ टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दिल्लीत डिझेलची किंमत ८२ रुपयांवरून ७३.६४ रुपये होईल, म्हणजेच प्रतिलिटर ८.३६ रुपये कमी होईल.पुढे ते म्हणाले, “व्यापाऱ्यांसह अनेक लोक डिझेलच्या किंमती कमी करण्याची मागणी करीत होते. याचा परिणाम उद्योगांच्या व इतर आस्थापनांच्या अर्थसंकल्पांवर होत होता, मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, र्गेल्या काही दिवसात त्यांच्या सरकारने सुरू केलेल्या जॉब पोर्टलला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे कारण पोर्टलवर सुमारे २२ लाख लोकांनी नोंदणी केली आहे.”दिल्लीच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी गेल्या आठवड्यात आम्ही बरीच पावले उचलली. आम्ही रस्त्याच्या कडेला असलेल्या विक्रेत्यांना त्यांचे काम पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली.”
या पोर्टलवर सुमारे ७,५७७ कंपन्या / मालकांनी नोंदणी केली आहे, २,०४,७८५ नोकर्या सूचीबद्ध आहेत आणि या पोर्टलवर ३,२२,८७२ लोकांनी नोकरीसाठी अर्ज केले आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी कोविड -१९ सेफ्टी प्रोटोकॉलची देखभाल करताना त्यांनी सर्व व्यावसायिकांना आस्थापने उघडण्याचे आवाहन केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी