टीसीएस’च्या वर्षाकाठी आधारित नफ्यात घट, शेअर्स बाय बॅक ची घोषणा

मुंबई, ८ ऑक्टोंबर २०२०: देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनं (टीसीएस) आर्थिक वर्ष २०२०-२१ च्या दुसर्‍या तिमाहीसाठी निकाल सादर केला आहे. कोरोना संकटाच्या वेळी कंपनीनं पहिल्या तिमाहीच्या तुलनेत चांगले परिणाम दिले. परंतु कंपनीचा नफा वर्षाकाठी आधारावर कमी झाला आहे.

दुसर्‍या तिमाहीत म्हणजे जुलै ते सप्टेंबर या कालावधीत कंपनीचा निव्वळ नफा ४.९ टक्क्यांनी वाढून ८,४३३ कोटी रुपये झाला. तर याच कालावधीत म्हणजेच आर्थिक वर्ष २०१९-२० च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीला ८,०४२ कोटी रुपयांचा नफा झाला होता.

दुसरीकडं टीसीएस’नं बुधवारी शेअर बाजाराला सांगितलं की निव्वळ नफ्यात कायदेशीर दाव्यासंदर्भात १,२१८ कोटी रुपयांच्या तरतूदीचा समावेश नाही. या तरतुदींमधून निव्वळ नफा ७,४७५ कोटी रुपयांवर आला. अशाप्रकारे, वार्षिक आधारावर कंपनीचा निव्वळ नफा ७.०५ टक्क्यांनी घसरला आहे. कारण, वित्तीय वर्ष २०१९-२० च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीला ८,०४२ कोटी रुपयांचा नफा झाला होता.

तिमाही दर तिमाहीच्या आधारावर, वित्तीय वर्ष २०२०-२१ च्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा ६.६६ टक्क्यांनी वाढला आहे. पहिल्या तिमाहीत कंपनीला ७,००८ कोटी रुपयांचा नफा झाला. जर आपण उत्पन्नाबद्दल बोललो तर आर्थिक वर्षाच्या जुलै ते सप्टेंबरच्या तिमाहीत तो ३ टक्क्यांनी वाढून ४०,१३५ कोटी झाला आहे, जो मागील वर्षातील याच तिमाहीत ३८,९७७ कोटी होता.

त्याशिवाय बोर्डाच्या बैठकीत प्रति इक्विटी शेअर ३,००० रुपये दराने १६,००० कोटी रुपयांच्या बायबॅक शेअर योजनेस मान्यता देण्यात आली आहे. हे बुधवारी टीसीएस’च्या बीएसई’च्या २,७३७.४ रुपयांच्या बंद किंमतीपेक्षा ही ९ टक्क्यांनी जास्त आहे. सुमारे ५,३३,३३,३३३ इक्विटी शेअर्स परत विकत घेतले जातील. हे कंपनीच्या एकूण पेड-अप शेअर्स भांडवलाच्या १.४२ टक्के आहे. याशिवाय कंपनीनं प्रति शेअर १२ रुपये अंतरिम लाभांश जाहीर केला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा