टीसीएस देशातील सर्वात मोठी कंपनी बनण्याच्या मार्गावर…?

8

मुंबई, ११ जानेवारी २०२१: भारतातील दोन दिग्गज कंपन्यांमधील संपत्ती फरक फार जवळ येत चालला आहे. या दोन्ही कंपन्यांच्या मार्केट कॅप मधील फरक खूप कमी होत चालला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि आयटी मधील दिग्गज कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या दोन्ही कंपन्यांमध्ये मार्केट कॅप म्हणजेच बाजार भांडवलातील फरक कमी होत चालला आहे.

कोरोना काळात या दोन्ही दिग्गज कंपन्यांच्या मार्केट कॅप मध्ये वाढ होताना दिसली होती. विशेषकरून रिलायन्स इंडस्ट्रीज मध्ये फेसबुक तसेच इतर बड्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर इन्वेस्टमेंट केली होती. परंतु, मागच्या काही महिन्यांपासून रिलायन्सच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण होताना दिसत आहे. यामुळे रिलायन्स’च्या मार्केट कॅप मध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण दिसून आली आहे. तर दुसरीकडे टीसीएस ने देखील कोरोना काळात आपल्या मार्केट कॅप मध्ये मोठी वाढ केली आहे.

जर मागच्याच आठवड्या विषयी बोलायचे झाले तर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड च्या मार्केट कॅप मध्ये सर्वाधिक घसरण बघण्यास मिळाली. ३४,२९६.३७ कोटी रुपयांची घसरण रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मार्केट कॅप मध्ये बघण्यास मिळाली. आता कंपनीचा मार्केट कॅप घसरून १२,२५,४४५.५९ कोटी रुपये राहिला आहे.

११.७० लाख कोटी रुपये वर गेला टीसीएस चा मार्केट कॅप

तर दुसरीकडे गेल्या आठवड्यात टीसीएस च्या मार्केट कॅप मध्ये मोठी वाढ दिसून आली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज च्या टीसीएस च्या मार्केट कॅप मध्ये ७२,१०२.०७ कोटी रुपयांची वाढ झाली. ज्यामुळे कंपनीचा मार्केट कॅप वाढून ११,७०,८७५.३६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. टीसीएस चा मार्केट कॅप रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मार्केट कॅप जवळ येऊन पोहोचला आहे.

जाणकारांचे असे म्हणणे आहे की, रिलायन्स ला मागे टाकून टीसीएस देशातील सर्वात मोठी कंपनी बनू शकते. याचे कारण असे आहे की, ८ जानेवारी रोजी टीसीएस ने आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत जे चांगले होते. अशी आशा व्यक्त केली जात आहे की, पुढच्या आठवड्यात देखील टी सी एस च्या शेअर्समध्ये होणारी वाढ कायम राहू शकते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा