चहा आणि सिगरेटमुळं कॅन्सरचा सर्वाधिक धोका, कॅन्सर होण्याची शक्यता पाचपट जास्त

पुणे, ७ नोव्हेंबर २०२०: आजच्या बदलत्या काळात आपलं आयुष्य देखील बदलत आहे.आणि यामुळं आहार असेल किंवा आरोग्य याची काळजी करण्याकडे मानव हल्ली दुर्लक्ष करत आहे. ज्यामुळं अनेक आजारांना आमंत्रण मिळतं. वेळेवर झोप, जेवण, व्यायम नसल्यास आरोग्य पुर्णपणे बिघडतं.

आज प्रत्येक व्यक्ती कामात इतका बिझी झाला आहे की त्यानं प्रत्येक गोष्टीत शाॅटकर्ट काढला आहे. खास करून जेवणाच्या बाबतीत. थोडा वेळ मिळाला आणि जरा डोक्यावर ताण असला की लगेच तो प्रेशर कमी करण्यासाठी किंवा सहज म्हणून चहा पीत स्मोक करतो.

अनेकांना चहा पिताना स्मोकिंग करण्याची सवय असते आणि ही सवय तुम्हाला असंल तर ती वेळेतच बदला कारण चहा सोबत स्मोक केल्यानं कर्करोग होण्याचा धोका पाचपट अधिक होतो. हे तुमच्या गळ्याला आणि पोटाच्या आरोग्यासाठी आतिशय घातक आहे.

चहा आणि स्मोकिंग मुळं इसोफेगस नावाचा कॅन्सर होत असून त्याचा गळा आणि पोट या दोन्ही भागांवर मोठ्या प्रमाणात प्रादूर्भाव होतो. गरम चहाने इसोफेगस टिश्यु खराब होतात. त्यामुळं तुम्हाला जर चहा आणि स्मोकची सवय असेल तर ती वेळेतच बदल करा.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा