उत्तर प्रदेश वासियांना मराठी भाषा शिकवा- कृपाशंकर सिंह यांचे योगी आदित्यनाथ यांना पत्र

लखनऊ, 8 जून 2022: महाराष्ट्रात परप्रांतीय मुख्यतः उत्तर प्रदेश वासीयां बाबत नेहमीच वाद पाहायला मिळाले आहेत. राज ठाकरे आणि उत्तर प्रदेश वासी हा वाद तर कायम चर्चेत राहिलाय. त्यावर आता भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी फुंकर मारण्याचा प्रयत्न केलाय. उत्तरप्रदेशातील शाळेत पर्यायी भाषा म्हणून मराठी भाषा शिकवा, या आशयाचं पत्र कृपाशंकर सिंह यांनी योगी आदित्यनाथ यांना पाठवलंय.


उत्तरप्रदेशातील लोकांना महाराष्ट्रात रोजगार मिळण्यासाठी त्यांना मराठी भाषा येणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्यांना पत्रव्यवहार करण्यासाठी ही भाषा येणं आवश्यक आहे. त्यासाठी त्यांना मराठी येणं आवश्यक झालंय. याचसाठी आता कृपाशंकर सिंह यांनी योगी आदित्यनाथ यांना पत्राद्वारे विनंती केलीय. पण, हे पत्र मात्र त्यांनी इंग्लिश भाषेतून लिहीलंय. या पत्रातून त्यांनी उत्तरप्रदेशवासियांना एक प्रकारे दिलासा आणि नवीन मार्ग देण्याचा प्रयत्न केलाय. त्यांनी उत्तर प्रदेश वासियांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे.


पण, दुसरीकडं मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उत्तर भारतीयींच्या विरोधात आहे. जिकडे महाराष्ट्रात इतरांची संख्या वाढत असताना मूळ मराठी माणूस सगळ्या सुविधांपासून वंचित राहतो. मग अशात उत्तर प्रदेश वासिय लोकांनी महाराष्ट्रात येऊन बस्तान का मांडावं? असा सवाल त्यांनी सर्वात आधी उठवला होता. मग आता अशा परिस्थितीत कृपाशंकर सिंह यांच्या या पत्राच्या कृतीला किती यश मिळणार, योगी आदित्यनाथ काय प्रतिक्रिया देतात आणि काय पाऊल उचलतात, हे पहावं लागेल .


न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा