कोविड -19 सर्वेक्षणातील सहभागी शिक्षकांचा शिक्षक दिनानिमित्त इंदापूर नगरपरिषदेकडून सन्मान

इंदापूर, दि. ५ सप्टेंबर २०२०: इंदापूर शहरातील भार्गव परिसरामध्ये इंदापूर नगरपरिषदेकडून कोविंड -19 सर्वेक्षणातील सहभागी शिक्षकांचा शिक्षक दिनानिमित्त नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल तसेच इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा यांच्या हस्ते शिक्षकांना मास्क, रुमाल व गुलाबाचे फुल देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
   

इंदापूर नगर परिषदेतर्फे दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सन्मान करण्यात येत असतो. यावर्षी कोरोना पार्श्वभूमीवर शिक्षकांनी शहरातील कुटुंबाचे आरोग्याच्या संदर्भामध्ये सर्वेक्षण करून आपले योगदान दिलेले आहे. आज शिक्षक दिनानिमित्त त्यांचा सन्मान करण्यात आला.१०४ शिक्षकांनी या सर्वेक्षणांमध्ये सहभाग नोंदविला आहे.
     

अंकिता शहा म्हणाल्या की,’ प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये शिक्षकांचे योगदान मोठे असते. अनेक प्रसंगामध्ये, व्यवहारांमध्ये व्यक्ती या शिक्षका सारख्या मार्गदर्शक म्हणून कार्यरत असतात. कुटुंबाची काळजी घेऊन या कोरोना संकटावर मात करण्याचा आपला प्रयत्न असला पाहिजे.’
   

डॉ. प्रदीप ठेंगल म्हणाले की, ‘मी देखील पी.एचडी. केली असल्याने शिक्षणक्षेत्राशी संबंधित माझा अनुभव आहे. समाज विकासामध्ये शिक्षकांचे कार्य उल्लेखनीय ठरते. कोरोना संदर्भातील सर्वेक्षणात शिक्षकांनी सहभाग घेऊन समाजाप्रती आपले योगदान दिले आहे.’ यावेळी प्रवीण धाईंजे, सुनील मोहिते, सुरेश सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
     

यावेळी प्रशासकीय अधिकारी वर्षा क्षिरसागर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अल्ताप पठाण यांनी केले. सूत्रसंचालन सुभाष ओव्हाळ यांनी केले. आभार गायकवाड यांनी मानले.

न्यूज अन कट प्रतिनिधी – निखिल कणसे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा