संपर्क फाउंडेशनच्या स्मार्ट शाळा प्रशिक्षणाला शिक्षकांचा उत्सुर्फ प्रतिसाद

नागपूर २१ मार्च २०२४ : नागपूरच्या जी.एस.रायसोनी विद्या निकेतन हिंगणे येथे नुकत्याच झालेल्या स्मार्ट TV प्रशिक्षणात बुधवारी हिंगणा तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण घेण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून हिंगणा तालुक्यातील गटविकास अधिकारी संदीप गोटशेलवार तसेच हिंगणा तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी जोत्सना हरडे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात झाली. या दरम्यान संपर्क फाउंडेशनच्यावतीने १ ते ५ या वर्गातील १५० शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. नागपूर जिल्ह्यातील नागपूर ग्रामीण, हिंगणा, कळमेश्वर, उमरेड आणि रामटेक याठीकाणी संपर्क फाऊन्डेशनने संपूर्ण शाळेला ४०० स्मार्ट टीव्ही आणि आज त्या स्मार्ट टीव्हीला जोडणारा डिवाइस गटविकास अधिकारी आणि गट शिक्षणाधिकारी यांच्या हस्ते शिक्षकांना देण्यात आला. हिंगणा तालुक्यात १०० स्मार्ट TV आणि सोबतच डिवाईस वाटप झाले.

संपर्क फाउंडेशनच्या वतीने शाळांना मोठा स्क्रीन आणि डिवाइस सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलाय. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकेल अशी प्रक्रिया व संबधीत घटकही यांमध्ये तयार करून दिली आहे. गरजू, होतकरू, गरीब विद्यार्थ्यांपर्यंत डिवाईसच्या माध्यमातून पोहोचू शकते. याला इंटरनेटची आवश्यकता किंवा गरज नाही. हे दुर्गम भागातमध्ये ही काम करू शकते. विद्यार्थ्यांना खूपच उपयुक्त आहे. मुलांना या मोठ्या स्क्रीनवर दाखवल्यानंतर त्याचा खूपच फायदा होऊ शकतो व मुलांची बुद्धिमत्ता वाढते.

यावेळी शिक्षक प्रशिक्षण केंद्रात ट्रेनिंग देणारे प्रमुख सौ. प्रियंका मेंढे, महेश होले आणि स्वप्निल चिकटे यांनी शिक्षकांना खुप चांगल्या प्रकारे प्रशिक्षण दिले. हिंगणा तालुक्यातील केंद्रप्रमुख भूपेश चव्हाण, राजकुमार पचारे, विजय धनकोतवाल, विजय कृपाल, लीलाधर चरपे, माया शेंडे, एकनाथ ढोरे, ज्ञानेश्वर आपतूरकर, संध्या येळणे, संघपाल शंभरकर या सर्वांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी शुभांगी वालदे, राजकुमार चोबे, सुरेखा घाटोळे, पुष्पा रेवतकर, अमर गायकवाड, हर्षा मोडक आणि अश्विनी मेश्राम यांनी आपले मनोगत व्यक्त केले . या कार्यक्रमाचे संचालन भूपेश चव्हाण केंद्रप्रमुख गुमगाव यांनी केले तर आभार केंद्र प्रमुख विजय धनकोतवाल यांनी मानले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : नीता सोनवणे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा