वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, शिखर धवनला नेतृत्व, रवींद्र जडेजा उपकर्णधार

India Vs West Indies, 6 जुलै 2022: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी शिखर धवनला टीम इंडियाचा कर्णधार बनवण्यात आलं आहे, तर रवींद्र जडेजा उपकर्णधार बनला आहे. इंग्लंडमध्ये होणार्‍या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेनंतर भारताला वेस्ट इंडिजचा दौरा करायचा आहे, जिथे तीन एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत.

बीसीसीआयने बुधवारी टीम इंडियाची घोषणा केली. यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडिया:

शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग

वनडे संघात अनेक नावांचे पुनरागमन झाले आहे. ज्यामध्ये संजू सॅमसन, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज या नावांचा समावेश आहे. या मालिकेत इशान किशन, शुभमन गिल यांनाही संधी देण्यात आली आहे.

भारताचा वेस्ट इंडिज दौरा

• पहिला एकदिवसीय – 22 जुलै संध्याकाळी 7 वाजता
• दुसरी वनडे – 24 जुलै संध्याकाळी 7 वाजता
• तिसरी एकदिवसीय – 27 जुलै, संध्याकाळी 7 वा

• पहिली T20 – 29 जुलै
• दुसरी T20 – 1 ऑगस्ट
• तिसरी T20 – 2 ऑगस्ट
• चौथी T20 – 6 ऑगस्ट
• पाचवी T20 – 7 ऑगस्ट

सध्या फक्त एकदिवसीय मालिकेसाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे, तर टी-20 मालिकेची घोषणा नंतर होईल. पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी वरिष्ठ खेळाडूंचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे. कारण टी-20 विश्वचषकाच्या तयारीसाठी ही अत्यंत महत्त्वाची मालिका आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा