WI मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहित कर्णधार, कोहलीही खेळणार, बुमराहला विश्रांती

वेस्ट इंडिज;28 जानेवारी 2022: वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आलीय. रोहित शर्माचं दोन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधार म्हणून पुनरागमन झालंय. तर विराट कोहली दोन्ही मालिकांसाठी उपलब्ध असेल. भुवनेश्वर कुमारला वनडे संघातून वगळण्यात आलंय, तर जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आलीय.

T20 संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान आणि हर्षल पटेल.

एकदिवसीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खान.

जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांना दोन्ही मालिकांमधून विश्रांती देण्यात आलीय. त्याचवेळी केएल राहुल दुसऱ्या वनडेतून संघात सामील होणार आहे. रवींद्र जडेजा अद्याप गुडघ्याच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही. सध्या तो तंदुरुस्तीच्या अंतिम टप्प्यात आहे, त्यामुळं त्याची दोन्ही मालिकांमध्ये निवड झाली नाही. अक्षर पटेलला फक्त टी-20 संघात स्थान मिळालं आहे.

या खेळाडूंचा संघात प्रवेश

कुलदीप यादवचं पुन्हा एकदा संघात पुनरागमन झालं असून, त्याचा वनडे संघात समावेश करण्यात आलाय. गुडघ्याच्या ऑपरेशननंतर कुलदीप यादवचे मर्यादित षटकांच्या संघात पुनरागमन झालं आहे. त्याचबरोबर रवी बिश्नोईची पहिल्यांदाच टीम इंडियात निवड होणार आहे. त्याला पदार्पणाची संधी आहे, रवी विश्नोईला दोन्ही संघात स्थान मिळालंय. विशेष म्हणजे दीपक हुडाला एकदिवसीय संघात संधी मिळाली आहे, हे नाव धक्कादायक आहे.

कर्णधार रोहित शर्मा परतला

कर्णधार रोहित शर्मा दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करत आहे. दुखापतीमुळं तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका खेळू शकला नाही. कर्णधार झाल्यानंतर रोहितची ही पहिली वनडे मालिका असंल. गेल्या काही दिवसांपासून तो बंगळुरू येथील नॅशनल क्रिकेट अकादमीत होता आणि तिथेच तो बरा होत होता. बीसीसीआयच्या नव्या नियमांनुसार, दुखापतीतून किंवा कोणत्याही समस्येतून पुनरागमन करणाऱ्या कोणत्याही खेळाडूला फिटनेस चाचणी उत्तीर्ण होणं आवश्यक आहे.

दोन्ही संघांमध्ये होणार एकदिवसीय-टी-20 मालिका

टीम इंडियाला घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध तीन वनडे आणि त्यानंतर तीन टी-20 मालिका खेळायच्या आहेत. एकदिवसीय मालिकेतील सर्व सामने 6, 9 आणि 11 फेब्रुवारी रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळले जातील. यानंतर, दोन्ही संघ 16, 18 आणि 20 फेब्रुवारी रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर तीन टी-20 मालिका खेळणार आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा