दुबई १८ फेब्रुवारी २०२५ : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ची मालिका सुरू होण्यासाठी अवघे काही तास राहिले असून १९ तारखेला या ट्रॉफीचा पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. यंदा चॅम्पियन्स ट्रॉफीच यजमानपद पाकिस्तान स्वीकारणार असून या मालिकेतील बहुतेक सामने पाकिस्तानमध्ये होणार आहे. टीम इंडियाचे सामने दुबई येथील आंतराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. यासाठी भारतीय संघ दुबईला पोहोचून कसून तयारीला लागला आहे. जरी भारत यंदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य किंवा अंतिम समन्यात जरी पोहोचला तरी भारताचे सामने पाकिस्तानात खेळवले जाणार नाही.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाचा “अ ” गटात समावेश असून ज्यामध्ये न्यूझीलंड , पाकिस्तान आणि बांग्लादेश या संघाचाही समावेश आहे. टीम इंडियाचा पहिला सामना बांगलादेश सोबत २० फेब्रुवारील खेळवण्यात येणार आहे . त्याचसोबत ज्या सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात अशा भारत आणि पाकिस्तान या दोन्ही उभय संघाचा सामना २३ फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे. आजवर पहायला गेले तर भारतीय संघाची दुबई येथील आंतराष्ट्रीय स्टेडियमवरची कामगिरी अत्यंत चांगली आणि शानदार राहिली आहे. चला तर जाणून घेऊया कसा राहिला आहे भारताचा दुबई येथील आंतराष्ट्रीय स्टेडियमवरील रेकॉर्ड.
आजवर भारताने २०१८ पासून दुबई येथील स्टेडियम ६ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यापैकी टीम इंडियाने ५ सामने आपल्या नावावर केले आहेत. त्यामुळे आतापर्यंत भारतीय संघाला येथे पराभव स्वीकारावा लागलेला नाही. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये भारतीय संघ हा आपला विक्रम कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल अशी अपेक्षा चाहत्यांना आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी, प्रथमेश पाटणकर