अंडर-19 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा, या खेळाडूंना मिळाली जागा

मुंबई, 20 डिसेंबर 2021: भारतीय संघ, अंडर-19 विश्वचषक: चार वेळा चॅम्पियन भारताने रविवारी अंडर-19 विश्वचषक 2022 साठी 17 जणांचा संघ जाहीर केला. दिल्लीचा फलंदाज यश दुल याला 17 जणांच्या संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. त्याचबरोबर एसके रशीद उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळतील. विशेष म्हणजे दोन यष्टीरक्षक दिनेश बाना आणि आराध्या यादव यांना संघात स्थान मिळाले आहे.

पुढील वर्षी 14 जानेवारी ते 5 फेब्रुवारी दरम्यान वेस्ट इंडिजमध्ये अंडर-19 विश्वचषक स्पर्धेची 14 वी आवृत्ती होणार आहे. कॅरिबियन भागातील चार देश याचे यजमानपद भूषवताना दिसतील. यादरम्यान 16 संघ 48 सामन्यांतून ट्रॉफीसाठी स्पर्धा करतील.

भारतीय संघ हा अंडर-19 विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. टीम इंडियाने 2000, 2008, 2012 आणि 2018 मध्ये अंडर-19 वर्ल्ड कप जिंकला होता. 2016 आणि 2020 मध्ये न्यूझीलंडमध्ये झालेल्या स्पर्धेच्या मागील आवृत्तीत भारत उपविजेता ठरला आहे.

अंडर-19 विश्वचषक स्पर्धेसाठी 16 संघांची चार गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर लीगमध्ये प्रवेश करतील, तर उर्वरित संघ 23 दिवसांच्या स्पर्धेत प्लेट गटात सामील होतील. भारताच्या 19 वर्षांखालील संघाला ब गटात ठेवण्यात आले आहे.

भारतीय संघ :

यश धुल (कर्णधार), हरनूर सिंग, आंगक्रिश रघुवंशी, एसके रशीद (उपकर्णधार), निशांत सिंधू, सिद्धार्थ यादव, अनिश्वर गौतम, दिनेश बाना (विकेटकीपर), आराध्या यादव (विकेटकीपर), राज अंगद बावा, मानव प्रकाश, कौशल तांबे , आर एस हंगरेकर, वासू वत्स, विकी ओस्तवाल, रविकुमार, गरव सांगवान

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा