टीम इंडियाचा नेदरलँडवर दमदार विजय, ५६ धावांनी सामना घातला खिशात

पुणे, २८ ऑक्टोबर २०२२ : टीम इंडियाने टी ट्वेंटी वर्ल्ड कपमधील दुसऱ्या सामन्यात जबरदस्त कामगिरी करताना भारताने नेदरलँडचा ५६ धावांनी पराभव केला. भारताने दिलेल्या १८० धावांचा पाठलाग करताना नेदरलँडचा संघ २० षटकात ९ विकेट्स गमावून १२३ धावा करू शकला.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकात २ गडी गमावून १७९ धावा केल्या. सलामीवीर फलंदाज के एल राहुल पुन्हा एकदा स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादवने नेदरलँडच्या गोलंदाजाचा धुव्वा उडवला. भारताकडून रोहित शर्मा ५३, विराट कोहली नाबाद ६२ आणि सूर्यकुमार नाबाद ५१ अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने नेदरलँड समोर १८० धावांचे आव्हान ठेवले.

भारताने दिलेल्या १८० धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या नेदरलँडला चांगली फलंदाजी करता आली नाही. भारताच्या गोलंदाजांनीही अचूक आणि भेदक गोलंदाजी केली. त्यामुळेच भारताला यावेळी दणदणीत विजय साकारता आला. नेदरलँड कडून टीम प्रिन्गल याने सर्वाधिक २० धावा केल्या. तर भारताकडून भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, अक्षर पटेल, आणि रविचंद्र अश्विनने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा