झुलनला टीम इंडियाचा विजयी निरोप! इंग्लंडच्या महिला संघाला व्हाईट वॉश

लंडन, २५ सप्टेंबर २०२२: भारतीय महिला संघाने इंग्लंड दौरा चांगलाच गाजवला आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडच्या महिला संघाचा १६ धावांनी पराभव केला. या विजयसह भारताने ३-० अशी मालिका जिंकली. शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा १६ धावांनी पराभव केला. भारतीय टीमने उत्कृष्ट गोलंदाजी आणि फिल्डिंग मुळे सामन्यात शानदार विजय मिळवला, मात्र या सामन्या दीप्ती शर्माने काढलेली विकेट चर्चेचा विषय ठरला आहे.

दरम्यान इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले, प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाची सुरुवात निराशा जनक झाली होती. २९ धावांवर ४ विकेट्स गेल्या होत्या. सलामीवर स्मृती मानधना आणि दीप्ती शर्मा यांनी ५८ धावांची भागीदारी करत टीम इंडियाचा डाव सावरला. स्मृतीने ५० धावा केल्या. तसेच मध्यक्रमात अष्टपैलू दीप्ती शर्माने ६८ धावांची महत्त्वाची खेळी केली. स्मृति बाद झाल्यानंतर टीम इंडियाच्या डावाची पुन्हा पडझड झाली. त्यानंतर भारतीय संघ ५० षटके देखील पूर्ण खेळू शकला नाही. त्यांनतर भारताने सर्व विकेट्स ४५.४ षटकात १६९ धावा करून गमावल्या.

टीम इंडियांने इंग्लंड पुढे १७० धावांचे आव्हान ठेवले होते. इंग्लंडने त्यांच्या डावाची सुरुवात सावधपणे केली होती. इंग्लंडची बिनबाद २७ धावा अशी धावसंख्या झाली होती. त्यानंतर रेणुका सिंह हिने तीन विकेट घेत इंग्लंडच्या संघाला धक्का दिला. इंग्लंडची अवस्था बिन बाद २७ वरून ५० धावांच्या आत मध्येच ४ बाद अशी झाली होती. त्यानंतर इंग्लंडची ७ बाद ६५ अशी स्थिती झाली. मात्र, चार्ली डीनने इंग्लंडच्या विजयासाठी प्रयत्न केले, त्यामुळे मॅच रंगदार स्थितीत पोहोचली होती. पण, जोन्सला रेणुका सिंह हिने २८ धावावर धावबाद करून आठवी विकेट मिळवली. इंग्लंडला फक्त १७ धावांची गरज होती. तेव्हा दीप्तीने चार्ली डीन क्रीजच्या पलीकडे गेली याचा फायदा घेत रन आउट केले, अखेरीस चार्लीच धावबाद झाली. इंग्लंडचा डाव १५३ धावांत संपुष्टात आला. भारताकडून रेणुका सिंह ने एकूण २९ धावांवर ४ गडी बाद केले. तर आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील अखेरचा सामना खेळणारी झुलनने दोन विकेट्स मिळवल्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा