नवी दिल्ली, १ मार्च २०२३ : टेक कंपनी टेक्नोने आज बार्सिलोनो येथे सुरू असलेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेस (MWC) २०२३ इव्हेंटमध्ये आपला पहिला फोल्डेबल ५G स्मार्टफोन Phantom V Fold लाँच केला आहे; तसेच या शोमध्ये अनेक मोबाईल कंपन्यांनी आपले नवीन स्मार्ट फोन्स लॉंच केले आहेत.
Phantom V Fold चे फिचर्स
डिस्प्ले : Phantom V Fold स्मार्ट फोन दोन डिस्प्लेंसह येतो. यामध्ये LTPO AMOLED पॅनेलवर बनविलेली ७.६५ इंचाची मुख्य स्क्रीन आहे. याचे रिझोल्यूशन २२९६ x २००० पिक्सेल २K+ आहे. टेक्नो फोनमध्ये फोनच्या बाहेरील बाजूस १०८० x २५५० पिक्सेल रिझोल्यूशनसह ६.४२ इंचाचा फूल HD+ AMOLED डिस्प्ले उपलब्ध आहे. Techno Phantom V Fold चे दोन्ही डिस्प्ले १२०Hz रिफ्रेश रेटवर काम करतात.
Phantom V Fold हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर
४ नॅनोमीटर फॅब्रिकेशन्सवर बनविलेले मीडियाटेक डायमेंसिटी ९००० + ऑक्टाकोर प्रोसेसर फोनमध्ये देण्यात आला आहे, जो ३.२GHz पर्यंत क्लॉक स्पीडवर काम करतो. ग्राफिक्ससाठी फोनमध्ये Mali G७१० GPU उपलब्ध आहे. टेक्नोचा हा फोल्डेबल फोन LPDDR5X RAM आणि UFS ३.१ स्टोरेज तंत्रज्ञानावर काम करतो; तसेच हा फोन Android १३ ऑपरेटिंग सिस्टमसह HiOS फोल्ड काम करतो.
टेक्नो फोनमध्ये विशेष कॅमेरा : टेक्नो फोनमध्ये अल्ट्रा क्लिअर ५ लेन्स फोटोग्राफी सिस्टीम वापरण्यात आली आहे. फोन फोल्ड केल्यानंतर बाहेरील स्क्रीनवर ३२ MP फ्रंट सेन्सर देण्यात आला आहे. त्याच वेळी, फोन उघडल्यानंतर, एक १६ MP फ्रंट कॅमेरा सेन्सर उपलब्ध आहे. टेक्नो फोनच्या मागील पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. यामध्ये ५०MP प्राथमिक सेन्सर, ५०MP पोर्ट्रेट टेली फोटो लेन्स आणि १३MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्सचा समावेश आहे.
टेक्नो फोनमध्ये बॅटरी आणि चार्जर : पॉवर बॅकअपसाठी, फोनमध्ये 45W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानासह ५०००mAh बॅटरी आहे. फँटम व्ही फोल्डमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, स्टीरिओ स्पीकर आणि यूएसबी टाइप-सी ऑडिओ देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये ५G SA/NSA, ड्युअल 4G VoLTE, Wi-Fi ६, ब्लूटूथ ५.३, GPS/GLONASS, USB Type-C आणि NFC चा देखील समावेश आहे.
टेक कंपनी टेकनोच्या Phantom V Fold च्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने भारतासह जागतिक बाजारपेठेसाठी या स्टायलिश आणि प्रगत डिझाइन केलेल्या स्मार्ट फोनची किंमतही जाहीर केली आहे. Techno Phantom V Fold ५G स्मार्ट फोन भारतात दोन प्रकारांमध्ये लॉंच करण्यात आला आहे. तर भारतात, त्याच्या १२GB + २५६GB व्हेरिएंटची किंमत ८९,९९९ रुपये आहे आणि १२GB + ५१२GB व्हेरिएंटची किंमत ९९,९९९ रुपये आहे. टेक्नोच्या Phantom V Fold फोन हा भारतात या आठवड्यात उपलब्ध होईल.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे