तेहरान येथे युक्रेन विमानाचा भूकंपामुळे अपघात

तेहरान : इराणची राजधानी असलेल्या तेहरानमध्ये युक्रेनच्या विमानाला सकाळच्या सुमारास मोठा अपघात झाला आहे. परंतु हा अपघात भूकंपाचे धक्के बसल्यामुळे झाला असल्याची माहिती समोर येत आहे. युनायटेड स्टेट जिओलॉजिकल सर्व्हेने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू हा बोरजजणाचा दक्षिण क्षेत्र होते. या भूकंपाची तीव्रता ४.९ रिष्टर स्केल इतकी होती.
भूकंपानंतर काही मिनिटातच हे युक्रेनचे विमान कोसळले असल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात १८० प्रवासी आणि क्रू मेंबर होते. या विमान अपघातात १६७ जणांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. हा अपघात इमाम खोमैनी विमानतळाजवळ झाला असल्याची माहिती मिळत आहे. या अपघाताविषयी स्थानिक वृत्तपत्रांनी दिली आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा