तेजश्री आव्हाळे,स्नेहल पवार व गीतांजली भडकुंबे प्रथम क्रमांकाच्या किर्लोस्कर पुरस्कारानं सन्मानित

पुणे, १४ नोव्हेंबर २०२२ : किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा अंतर्गत टाकाऊ पासुन टिकाऊ स्पर्धेअंतर्गत रिसायकल प्लास्टीक बाॅटल ग्रीन हाऊस हा प्रकल्प बनविल्याबद्दल लायन राजेश कोथावडे, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ऑफ लायन्स क्लब पुणे यांच्या हस्ते भोसरी येथे आयोजित कार्यक्रमात तेजश्री आव्हाळे, स्नेहल पवार, गीतांजली भडकुंबे या विद्यार्थिनींना प्रथम क्रमांकाचा किर्लोस्कर वसुंधरा हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.

या स्पर्धेमध्ये शंभराहून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. पुण्यातील हडपसर येथील आण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्नेहा शिंदे व अंजली कामशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेत पर्यावरणाचा अभ्यास करत टाकाऊ पासुन टिकाऊ वस्तु स्पर्धे अंतर्गत रिसायकल प्लास्टीक बाॅटल ग्रीन हाऊस हा प्रकल्प बनविला. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी राजु भावसर व स्नेहा फुलकर यांनी सहकार्य केलं.

प्लास्टीक मुळं पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होताना आपण उघड्या डोळयांनी पाहतो. याला समाजातील सर्व घटक जबाबदार आहेत. प्लास्टीक कसं व कोठे जीरवलं पाहीजे यावर या विद्यार्थिनींनी हा प्रकल्प तयार केलाय.

कार्यक्रमाला किर्लोस्कर प्राॅ प्रॉपर्टीचे प्रमुख आनंद चितळे, आर एससीओइचे प्राचार्य डॉ. राकेश जैन, पद्मश्री गिरीष प्रभुणे आदी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा