तेलंगणातील भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांचं पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य!

तेलंगणा, २३ ऑगस्ट २०२२: भारतीय जनता पक्षाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा प्रकरण अजून संपलेलं नाही तोच राजा सिंह यांनी पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप आहे. यानंतर संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले असुन आमदार राजा सिंह याना अटक करा अशी मागणी केली आहे.

आमदार राजा सिंह यांच्‍या वर गुन्हा दाखल?

डीसीपी साई चैतन्य म्हणाले की, आमदार टी. राजा सिंह यांनी पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल कथित अपमानास्पद वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत त्यामुळे त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी.
काल रात्री दक्षिण झोन डीसीपी कार्यालयात मोठ्या संख्येने लोकांनी निदर्शने केली. भाजप आमदाराने आमच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी.

सोशल मीडियावर वादग्रस्त टिप्पणी !

आमदार टी राजा सिंह यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडिओबाबत त्यांनी कथितरित्या प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी केली.

यापूर्वी टी. राजा सिंह यांनी कॉमेडियन मुनव्वर फारुकीला त्याचा शो रद्द करण्याची धमकी दिली होती. डीसीपी चैतन्य म्हणाले, आमदार टी राजा सिंह विरुद्ध अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा