व्हॉट्स अ‍ॅपला टक्कर देणार टेलिग्राम…..

मुंबई, २८ जुलै २०२० भारत चीनच्या ताणवपुर्ण वातावरणात भारताने अनेक परदेशी अ‍ॅप्सवर बंदी घालत आपल्या स्वबळाचा सक्षम पुरावा दिला आहे.त्यातच भारतातील अनेक नवीन अॅप्स यांनी आधुनिक बदल केले असून बाजारातील इतर अ‍ॅप्सला टक्कर देण्याचा ते प्रयत्न करत आहे.

टेलिग्रामने व्हॉट्सअ‍ॅपला टक्कर देण्यासाठी आणखी काही खास फीचर्स आणले आहेत. टेलिग्रामवर आता २ जीबी पर्यंतची फाइल शेअर करता येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर केवळ १६ एमबीपर्यंतचीच फाईल शेअर करता येते. याआधी टेलिग्रामवर १.५ जीबी पर्यंत डेटा शेअर करता येत असे. या नवीन फीचरमुळे युजर्सला मोठे व्हिडिओ पाठविण्यासाठी फायदा होईल.

याशिवाय टेलिग्रामने अँड्राईड युजर्ससाठी नवीन डिझाईनचे म्यूझिक सादर केले आहे. टेलिग्रामचे डेस्कटॉप युजर आता एका सोबत तीन अकाउंट लॉगइन करू शकतात. टेलिग्राम आता प्रोफाईल व्हिडिओ अपलोड करण्याची देखील सुविधा देत आहे. प्रोफाईल व्हिडिओमध्ये फ्रेमचा समावेश करता येईल.यातील आणखी एक खास गोष्ट म्हणजे कोणाला व्हिडिओ शेअर करण्याआधी व्हिडिओ एडिट देखील करता येईल. प्रोफाईल व्हिडिओला देखील एडिट करणे शक्य आहे.

टेलिग्राम अ‍ॅपचे भारतात आता युजर्स हे मोठ्या प्रमाणात वाढले आहे.तर टेलिग्राम हा सर्वांचा पंसतींस उतरत आहे.या नवीन फिचर्स मुळे युजर्स देखील आंनदात आहेत.आणि भारताने पुन्हा ४० पेक्षा जास्त चीनी अॅप्स वर बंदी घातली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा