तिला सांगा ”ही फक्त मासिक पाळी आहे” – अभिनेता सुनील शेट्टींचा स्तुत्य उपक्रम

मुंबई, २८ सप्टेंबर २०२०: आज भारतात ”कन्या दिवस” साजरा केला जात आहे. अनेकजण स्वतःच्या मुलीसह फोटोज शेयर करत आहे. बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी यांनीही आपली मुलगी अथिया सोबतचे फोटोज शेयर केले आहेत. त्यानंतर त्यांनी इंस्टाग्रामवर ए
क फोटो पोस्ट करत सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. 

सुनील शेट्टींनी कोणता सामाजिक संदेश दिला?

सुनील शेट्टींनी इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला. त्यात ते स्वतः हातात एक साइन बोर्ड घेऊन उभे आहेत. या बोर्डवर ”Tell her #ItsJustAPeriod” असं लिहिण्यात आलं आहे. या फोटोद्वारे अभिनेते सुनील शेट्टी समाजाला मासिक पाळीबद्दल जागरूक करण्याचा प्रयत्न करत आहेत. मुली वयात येत असताना त्यांना मासिक पाळी येते. मात्र अनेक मुलींना मासिक पाळी म्हणजे काय? हे माहित नसल्यानं ते या दरम्यान भीती आणि लज्जेने तणावात असतात. त्यामुळे प्रत्येक पालकांनी आपल्या मुलीला मासिक पाळीबद्दल माहिती देऊन यात गैर असे काही नसून ते अगदी नैसर्गिक आहे त्यामुळे त्यांना धीर द्यावा. या काळातून मुलींना एकटं जावं लागू नये यासाठी सुनील शेट्टींचा हा प्रयत्न आहे. 

आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये सुनील शेट्टी लिहितात की –  

अथिया मला दिलेल्या आनंदाच्या अनंत क्षणांची नेहमी आठवण करून देते. जेव्हा ती लहान होती, तेव्हा मला खात्री करुन घ्यायची होती की तिच्या जीवनात काय टाकायचे ते हाताळण्यासाठी ती सुसज्ज आहे. आणि त्यात तिच्या पहिल्या कालावधीचा समावेश होता. पालक म्हणून, आम्ही तिला पीरियड्स काय आहेत आणि ती कशी व्यवस्थापित करू शकते हे समजावण्यासाठी कधीही मागेपुढे पाहिले नाही. बर्‍याच तरुण मुलींना अजूनही या काळात एकट्याने आणि घाबरलेल्या अनुभवातून जावे लागले हे पाहून मला त्रास होतो. म्हणूनच, आज तुम्ही माझ्यासोबत शपथ घ्या की, तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहाल, आणि कोणत्याही मुलीला या प्रवासातून एकटे जाण्याची वेळ येणार नाही, कारण ती अगदी नैसर्गिक आणि सामान्य आहे याची जाणीव तिला असणे आवश्यक आहे. कारण, ”ही फक्त मासिक पाळी आहे.” 

सुनील शेट्टीच्या या उपक्रमाचं अनेकांनी कौतुक करत ” अ ट्रू जेंटलमॅन” म्हणत याला समर्थन दिलं आहे. कन्या दिवस साजरा करत असताना मुलींच्या ”मासिक पाळी”बद्दल जागरूकता करण्याचा सुनील शेट्टीचा हा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे. 

न्यूज अनकट प्रतिनिधी: अक्षय बैसाणे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा