बीड मधील मंगेशच्या मदतीला धावली टेंभुर्णीची संस्था

बीड, दि. २१ जुलै २०२०: बीड जिल्ह्यातील आष्टी येथील इयत्ता पाचवीत शिकणा-या मंगेश वाळकेच्या वडिलांचे तो लहान असतानाच निधन झाले आहे. त्याची आई अपंग आहे. परिस्थिति हलाखीची आहे. काही महिन्यांपूर्वी “फेसबुक” व दैनिकामधून चौथीच्या त्या मुलाने “माझे पप्पा” हा निबंध नव्हे तर मनातील भावना कागदावर उतरविल्याने तो निबंध बीड जिल्ह्यात सोशल मिडियावर प्रसिद्ध झाल्याने जरी राजकीय पुढाऱ्यांना याचा काही गंजही वाटला नसेल.

तरी सर्वसामान्याला डोळ्यांत पाणी आल्या शिवाय राहत नाही अशाच एक टेंभुर्णी येथील सामाजिक संघटनेने “एक मदतीचा” हात देत अवरऑन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बशिर जहागिरदार यांनी मंगेशची शिक्षिका यांनी मंगेशसाठी मदतीचे आव्हान केले होते.

त्या अनुषंगाने सोमवार २० जुलै रोजी आष्टी येथे जाऊन आवर ऑन फाउंडेशन टेंभुर्णीच्या वतीने मंगेश वाळके याला पुढील शिक्षणासाठी २० हजाराची आर्थिक मदत देण्यात आल्याने या संघटनेचे बीड, सोलापूर जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रदीप पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा