राज्यातील ग्रामसभांना पुढील आदेशापर्यंत तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती

मुंबई, दि. १३ मे २०२०: कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील ग्रामसभांना पुढील आदेशापर्यंत तात्पुरत्या स्वरुपात स्थगितीचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे मे महिन्यात घेणे बंधनकारक असलेली ग्रामसभा होणार नाही. तसेच पुढील आदेश होईपर्यंत इतर कोणत्याही ग्रामसभेचे आयोजन करू नये असे आदेश ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत.

राज्यात काही ग्रामपंचायतींच्या रिक्त असलेल्या सरपंच व उपसरपंच पदांच्या निवडी होण्यासाठी आवश्यक असलेली ग्रामपंचायतीची बैठक घेण्यास संमती देण्यात आली आहे. या बैठकांमध्ये कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करावे अशी सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक, पोटनिवडणुकीशी संबंधित कामकाज आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात आले आहे. आजच्या निर्णयामुळे सरपंच, उपसरपंचांच्या राजीनाम्यामुळे किंवा इतर कारणाने रिक्त झालेल्या पदांची निवड होणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा