कबनूर येथे विहिंप, बजरंग दलाचा फलक फाडल्याने तणाव

इचलकरंजी, कोल्हापूर २६ जुलै २०२३ : कबनूर-चंदूर रोडवरील दत्तनगरातील तीन नंबर गल्लीच्या कोपऱ्यावर असलेल्या विश्व हिंदू परिषद- बजरंग दलाचा फलक अज्ञाताने फाडल्याचे आज सकाळी निदर्शनास आले. त्यामुळे हिंदुत्ववादी कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध करून दत्तनगर बंदची हाक दिली.

घटनेनंतर याभागातील दुकानदार, व्यावसायिक यांनी दुकाने बंद केली. यानंतर कार्यकर्त्यांनी मोटर सायकल रॅली काढून कबनूर बंदची हाक दिली. या आवाहनाला प्रतिसाद देत कबनूर गाव बंद ठेवण्यात आले. गावात तणावपूर्ण वातावरण बनले होते. दरम्यान शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजू तहसीलदार यांनी दत्तनगरला भेट दिली आहे.

या घटनेचा तपास करुन संबंधितांवर गुन्हे दाखल करुन योग्य ती कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले. यावेळी बजरंग दलाचे दत्ता पाटील, पंढरीनाथ ठाणेकर, महेश कोरवी, सचिन वडर, राजू शिंदे, भिकाजी चौगुले, आण्णा सुतार आदीसह इचलकरंजी येथील हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते‌.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा