दहावी व बारावीच्या निकालाची महिनाभर करावी लागणार प्रतिक्षा

पुणे, २२ जून २०२० : १० व १२ वीच्या निकालासाठी
आणखीन महिनाभर करावी लागणार प्रतीक्षा? महाराष्ट्रातील संपुर्ण विद्यार्थी वर्गात सध्या दहावी व बारावीच्या निकालाची उत्सुकता आहे मात्र अद्याप महाराष्ट्र शिक्षण बोर्ड मंडळाकडून निकालाच्या तारखे संदर्भात स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.

कोरोना व्हायरसमुळे यंदा पेपर घेण्यापासून ते तपासणी पर्यंत सगळ्याच गोष्टींसाठी विलंब झाला होता. परिणामी आता निकालासाठी सुद्धा आणखीन वाट पाहावी लागणार असल्याचे चिन्ह आहे. अलीकडे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीचे निकाल जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागणार असल्याचे संकेत दिले होते.

सध्याची परिस्थिती पाहता साधारण २७ ते २८ जुलै पर्यंत निकाल लागू शकतो असे दिसून येत आहे.पेपर तपासणीचे काम आता शेवटच्या टप्प्यात आहे. निकालाच्या तारखेबाबत योग्य माहिती जाणून घेण्यासाठी ‘mahresult.nic.in’ ऑफिशियल संकेतस्थळाला भेट द्या.

महाराष्ट्रामध्ये यंदा सुमारे १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थांनी दहावीची परीक्षा दिली आहे. कोरोनाची दहशत असल्याने भूगोलाचा पेपर यंदा रद्द करण्यात आला आहे. या विषयाचे मार्क्स विद्यार्थ्यांना इतर विषयांच्या सरासरीने दिले जाणार आहेत अशी घोषणा मंडळाने केली आहे. तर बारावीचे पेपर संपल्यानंतर लगेचच लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते.

या निकालाची तारीख जाहीर होताच निकाल ऑनलाईन कसा पाहायचा याविषयी ही मंडळालाने माहिती दिली आहे. महाराष्ट्र राज्य १० वी,१२ वी बोर्डाच्या निकालाच्या तारखांबाबत शिक्षण मंडळाने हे स्पष्टीकरणाने दिले आहे .

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा