दहावीचा निकाल जाहीर, राज्यात एकूण ९५.३० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

पुणे, २९ जुलै २०२०: प्रलंबित असलेला एस एस सी दहावीचा निकाल आज लागला आहे. काही दिवसापूर्वी एच एस सी बारावीचा निकाल लागला होता. बारावीच्या निकाला मध्ये कोकण विभागाने बाजी मारली होती त्याचप्रमाणे आता दहावीच्या निकालामध्ये देखील कोकण विभागाने यंदा बाजी मारली आहे. यावर्षी दहावीचा निकाल राज्यामध्ये ९५.३० टक्के एवढा लागला आहे. विशेष म्हणजे नेहमीप्रमाणेच यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे.

यंदा दहावीच्या परीक्षेसाठी १५,८४,२६४ विद्यार्थी सहभागी झाले होते. यापैकी १५,०१,१०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दिव्यांग विद्यार्थी देखील यामध्ये मागे राहिलेले नाही. दिव्यांग विद्यार्थ्यांचे निकाल ९२.७३ टक्के लागला आहे. तर दहावीच्या परीक्षेत ९६.९१ टक्के मुली, तर ९३.९० टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत.

विभागीय टक्केवारी:

कोकण: ९८.७७ टक्के
पुणे: ९७.३४ टक्के
कोल्हापूर: ९७.६४ टक्के
मुंबई: ९६.७२ टक्के
अमरावती: ९५.१४ टक्के
नागपूर: ९३.८४ टक्के
नाशिक: ९३.७३ टक्के
लातूर: ९३.०९ टक्के
औरंगाबाद: ९२ टक्के

निकाल कुठे व कसा पहाल:

www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबतच वेगवेगळी सांख्यिकी माहिती देखील उपलब्ध असणार आहे. निकालाची संबंधित आणखीन वेबसाईट खाली दिले आहेत.

> www.mahresult.nic.in
> www.sscresult.mkcl.org
> www.maharashtraeducation.com

• निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या कोणत्याही वेबसाईटवर जा.

• त्यानंतर तुम्हाला SSC BOARD RESULT नावाचा ऑप्शन दिसेल.

• त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर स्पेसशिवाय टाईप करावा लागेल.

• त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाकावी लागतील.

• यानंतर लगेचच तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर पाहाता येईल

• निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो डाऊनलोडही करता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.

महत्वाचे:

ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून विद्यार्थ्यांना अनिवार्य विषयांत (श्रेणी विषय वगळता) मिळालेल्या गुणांची पडताळणी (रिचेकिंग) किंवा उत्तरपत्रिकांची फोटोकॉपी, पुनर्मूल्यांकन, स्थलांतर प्रमाणपत्र यासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने स्वतः किंवा शाळेमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध होईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा