पुणे , १८ जुलै २०२०: उद्यापासून काय सुरु राहणार
१) सर्व किराणा दुकाने, सर्व किरकोळ व ठोक विक्रेते ( फक्त अत्यावश्यक वस्तु ) यांची दुकाने १९ ते २३ जुलै या कालावधीत सकाळी 8 ते दुपारी
१२ वा. पर्यंत सुरू राहतील.
२) मटन, चिकन, अंडी, मासे इत्यादीची विक्री सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत चालू राहील.
३) ई-कॉमर्स सेवा उदा. अमॅझॉन, फ्लीपकार्ट व तत्सम सेवा उद्यापासून चालु होतील. यामध्ये जीवनावश्यक वस्तुंचे , औषधे व तयार अन्नपदार्थांचे
घरपोच वाटप सकाळी ८ ते राजी १० या कालावधीतच मनपाच्या पुर्व मान्यतेने पास घेवून सुरू राहील.
४) शेतकरी आठवडी बाजार तसेच भाजी व फळांची विक्री करणारे अधिकृत फेरीवाले यांच्या मार्फत करण्यात येणारी विक्री सकाळी सकाळी ८
ते दुपारी १२ पर्यंत चालू राहतील.
५) पेट्रोलपंप व गॅसपंप सकाळी ९ ते दुपारी ६ या वेळेत सुरु राहतील व ते केवळ शासकीय वाहने, अत्यावश्यक सेवेतील पुरवठा साखळीतील
वाहने तसेच पासधारक वाहनांना इंधन पुरवठा.
या गोष्टी २३ जुलै पर्यंत बंदच राहतील.
१) झोमॅटो, स्विगी व तत्सम आनलाईन पोर्टलवरुन मागवीले जाणारे खादयपदार्थ.
२) केस कर्तनालय, स्पा, सलून, ब्युटी पार्लर इत्यादी आस्थापना व सेवा संपुर्ण बंद राहतील.
खाजगी कार्यालये / आस्थापना संपुर्णतः बंद राहतील.
३) उपहारगृह, लॉज, हॉटेल.
४) सार्वजनिक ठिकाणी/ ररत्यावर मॉर्निंग वॉक, इव्निंग वॉक, जॉगिंग, शारीक व्यायाम करण्यास मनाई राहील.
५) मद्य विक्री बंद राहील.
न्यूज अनकट प्रतिनिधी