वॉशिंग्टन डी.सी.मध्ये भीषण हवाई अपघात! प्रवासी विमान थेट नदीत कोसळले, आकाशात आगीचा गोळा!

22

वॉशिंग्टन ३० जानेवारी २०२५ ; वॉशिंग्टन डी.सी. – अमेरिकेच्या राजधानीत आज एक भीषण हवाई अपघात घडला. रोनाल्ड रीगन इंटरनॅशनल एअरपोर्टवर उतरणाऱ्या प्रवासी विमानाने हेलिकॉप्टरला जोरदार धडक दिली, त्यानंतर काही सेकंदांतच विमानाने नियंत्रण गमावले आणि थेट पोटोमॅक नदीत कोसळले! या अपघाताने अमेरिकेत एकच खळबळ उडाली असून, ६० हून अधिक प्रवाशांचे जीव धोक्यात आहेत.

अपघातानंतर विमानाने तात्काळ पेट घेतला आणि काही क्षणांतच आकाशात मोठा आगीचा स्फोट झाला. दुर्घटनेचे काही थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये विमान आगीच्या गोळ्यासारखे खाली कोसळतानाचे भयावह दृश्य स्पष्ट दिसत आहे.

अपघातानंतर तत्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले असून, पोटोमॅक नदीतील बर्फामुळे बचाव मोहिमेत अडथळे येत आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या बचावाबाबत चिंता वाढली आहे. हेलिकॉप्टरमधील कर्मचाऱ्यांचेही अद्याप काहीही ठोस माहिती समोर आलेली नाही.

या भीषण दुर्घटनेमागे फक्त अपघात आहे की कोणता मोठा कट? याचा तपास सुरू आहे. विशेष म्हणजे, घटनेच्या वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हाइट हाऊसमध्ये उपस्थित होते. त्यामुळे या घटनेबाबत संशय वाढत चालला आहे.

या अपघातानंतर संपूर्ण वॉशिंग्टन डी.सी.मध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला असून, सर्व विमान उड्डाणे तत्काळ थांबवण्यात आली आहेत. सुरक्षायंत्रणा युद्धपातळीवर काम करत असून, ही अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात भीषण हवाई दुर्घटना ठरू शकते.

संपूर्ण जगाचे लक्ष आता या दुर्घटनेच्या तपासावर लागले आहे. या घटनेचे खरे कारण लवकरच उघड होईल का? हाच मोठा प्रश्न आहे! या विषयाशी संबंधीत पूर्ण अपडेट्स तुम्हाला न्यूज चॅनलवर पाहायला मिळेल .

न्यूज अनकट प्रतिनिधी – सोनाली तांबे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा