पुणे-भुवनेश्वर विमानाला ‘बर्ड हिट’चा धक्का मोठी दुर्घटना टळली, प्रवासी भयभीत

150 Passengers Return from the Brink of Disaster! Terrifying Bird-Hit at Pune Airport; Tragedy Averted but Panic Soars

पुणे विमानतळावर बुधवारी दुपारी एका थरारक प्रसंगाची नोंद झाली. भुवनेश्वरकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI 1098 या विमानाला उड्डाणाच्या क्षणी ‘बर्ड-हिट’ म्हणजेच पक्षी धडकल्याची घटना घडली. धावपट्टीवर वेग पकडत असताना विमानाच्या उजव्या बाजूच्या इंजिनमधील तब्बल पाच ब्लेड निकामी झाले. जर पायलटने प्रसंगावधान राखून वेळीच विमान थांबवले नसते, तर हा प्रसंग मोठ्या हवाई दुर्घटनेमध्ये बदलला असता!

या अपघातामुळे १५० हून अधिक प्रवाशांचे प्राण वाचले, पण हृदयाचे ठोके चुकवणारा हा क्षण काही प्रवाशांच्या चेहऱ्यावर अजूनही भीतीचे सावट निर्माण करतो आहे.

विमान थेट पार्किंग-बेमध्ये परत नेण्यात आले, पण या घटनेने पुणे विमानतळावरील सुरक्षिततेचा फज्जा उडवला. मागील चार महिन्यांपासून बर्ड-हिट आणि प्राण्यांचा वावर हा धोकादायक ट्रेंड झाला आहे. मोर, कुत्रे आणि पक्ष्यांचा मुक्त वावर धावपट्टीवर नेमका कसा? हे प्रश्न निर्माण झाले आहेत.

एका आठवड्यातील नववी आणि सात महिन्यांतील १२वी बर्ड-हिट घटना म्हणजे अपघाताची वेळ केवळ सरकवली जातेय, टळते नाही!

हवाई तज्ज्ञ धैर्यशील वंडेकर यांनी थेट प्रशासनालाच प्रश्न केला — “या घटना केवळ अपघात नसून व्यवस्थेतील दुर्लक्षाचे परिणाम आहेत!

महापालिका, हवाई दल, आणि विमानतळ प्रशासन यांच्यात समन्वयाचा पूर्ण अभाव असल्याने विमानतळ आज अपघातांच्या सावटाखाली आहे. विमानतळ संचालक संतोष ढोके यांनी चौकशीचे आणि कारवाईचे आश्वासन दिले असले, तरीही सातत्याने घडणाऱ्या घटनांमुळे प्रशासनाच्या गंभीरतेवर संशय घेण्याची वेळ आली आहे.