टेरर फंडिंग प्रकरण: एनआयएचे बिहार-झारखंडसह 4 राज्यांतील 26 ठिकाणी छापे

नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी 2022: नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (एनआयए) शनिवारी माओवाद्यांच्या टेरर फंडिंग प्रकरणात चार राज्यांत छापे टाकले. या पथकानं चारही राज्यात 26 ठिकाणी छापे टाकले आहेत. स्थानिक पोलिस, बिहार एसटीएफ आणि सीआरपीएफच्या मदतीने एनआयएने जेहानाबादमध्ये 8, पाटणा ग्रामीणमध्ये 2, अरवालमध्ये 1, नालंदामध्ये 1, गयामध्ये 8, नवादामध्ये 1 आणि औरंगाबादमध्ये 2 ठिकाणी छापे टाकले. याशिवाय झारखंडमधील कोडरमा येथे 1, ओडिशातील भुवनेश्वर येथे 1 आणि आंध्र प्रदेशातील नेल्लोर येथे 1 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. या ठिकाणी आरोपी आणि संशयितांच्या ठिकाणांवर छापे टाकून शोधमोहीम राबवण्यात आलीय.

हे प्रकरण बिहारच्या मगध प्रदेशात सीपीआय (माओवादी) केडर आणि ओव्हर ग्राउंड वर्कर्स (ओजीडब्ल्यू) द्वारे चालवलेल्या दहशतवादाच्या नेटवर्कशी संबंधित आहे. त्यांचे नापाक हेतू पुढं नेण्यासाठी, विविध तुरुंगांमध्ये, जमिनीवर काम करणाऱ्या नक्षलवाद्यांशी संपर्क साधण्यासाठी, शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा खरेदीसाठी निधी गोळा करण्यासाठी आणि नवीन केडरची भरती करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत जेणेकरून या भागातील नक्षल कारवायांना पुन्हा बळ मिळावं.

शनिवारी घेतलेल्या झडतीमध्ये 3 देशी बनावटीची पिस्तूल, .315 बोअरची रायफल, 59 जिवंत राउंड, अनेक डिजिटल उपकरणं, नक्षलवादी साहित्य, गुन्ह्याची कागदपत्रं आणि 4 किलो संशयित अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

तामिळनाडूतही टाकण्यात आले छापे

त्याचवेळी तामिळनाडूतील तंजावर येथेही एनआयएच्या पथकानं छापा टाकला. सूत्रांनी सांगितलं की, अहमद या दुचाकी मेकॅनिकच्या घरांची झडती घेण्यात आली होती, अब्दुल खादर, ज्याला खिलाफत चळवळीचा भाग असल्याच्या आरोपाखाली एक वर्षापूर्वी अटक करण्यात आली होती, त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे झडती घेण्यात आली. याशिवाय मन्नई बाबा या आणखी एका व्यक्तीच्या घरावरही छापे टाकण्यात आले. मन्नई बाबालाही चार महिन्यांसाठी अटक करण्यात आली होती.

तब्बल पाच तास चाललेल्या तपासादरम्यान खडेर आणि अहमद यांच्या निवासस्थानाबाहेर मोठा जमाव जमला होता. लोकांनी एनआयएविरोधात घोषणाबाजी केली आणि टीमच्या कारवाईला विरोधही केला. यानंतर स्थानिक पोलिसांनी तातडीनं हस्तक्षेप करून प्रकरण शांत केलं. दुसरीकडं, खादर आणि अहमद या दोघांनी सांगितलं की, एनआयए टीमने त्यांच्या आधार कार्डचा तपशील घेतला, त्यांचे फोन जप्त करण्यात आले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा