मुंबईत दहशतवादी हल्ल्याची शक्यता, ड्रोन उडवण्यावर बंदी

मुंबई, २७ ऑक्टोबर २०२०: दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुढील ३० दिवस सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हा हल्ला ड्रोनच्या माध्यमातून होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळं मुंबईमध्ये पुढील काळात ड्रोन वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे दिवाळीमुळं मुंबईत मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. खरेदीसाठी लोक बाहेर पडतात. या गर्दीचा फायदा घेऊन दहशतवादी घातपात करण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुंबईवर दहशतवादी हल्ला होण्याची माहिती गुप्तहेर विभागानं दिली आहे.

मुंबईत छोटया ड्रोन उड्डाणावर बंदी घालण्यात आली आहे. ३० ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबर पर्यंत ड्रोन उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या काळात मुंबईमध्ये सुरक्षा बंदोबस्त देखील वाढवला जाऊ शकतो. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कलम १८८ अतंर्गत कारवाई होऊ शकते. असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

मुंबई शहर दहशतवाद्यांच्या नेहमीच निशाणावर राहिलं आहे. आगामी काळात दिवाळीसारखा मोठा सण येत आहे. त्याच बरोबर आता राज्यात अनलॉक मोहिम देखील सुरू करण्यात आली आहे. तर दुसरीकडं मुंबईमध्ये कोरोना चा प्रसार देखील कमी झाला आहे. परिणामी दिवाळीच्या खरेदीसाठी लोकं मोठ्या प्रमाणावर बाहेर पडण्याची शक्यता आहे. अशा गर्दीमध्ये दहशतवाद्यांकडून घातपात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा