बारामूलामध्ये सुरक्षा दलांवर दहशतवाद्यांचा हल्ला एक जवान शहीद

जम्मू काश्मीर, १२ ऑगस्ट २०२०: जम्मू कश्मीर मध्ये गस्त घालत असलेल्या सैन्याच्या एका गटावर आतंकवाद्यांनी हल्ला केला आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमधील ह्यगाम भागात संशयित दहशतवाद्यांनी गस्त घालत असलेल्या सैन्याच्या गटावर हल्ला केला. या हल्ल्यात सैन्यातील एका जवानाला दुखापत झाली आहे. त्याला तातडीने रुग्णालयात प्रति केले.

मिळालेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी ह्यागममधील टाईमपास हॉटेल जवळ गस्त घालत असलेल्या सैन्या, सीआरपीएफ आणि पोलिसांच्या तुकडी वर गोळ्यांच्या काही फेऱ्या झाडल्या. ह्यानंतर सुरक्षा दलाने ताबडतोब कारवाई करत प्रत्युत्तर म्हणून गोळ्या झाडण्यास सुरुवात केली परंतु आतंकवादी पळून जाण्यात यशस्वी झाले.

येथील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने असे सांगितले की, या चकमकी दरम्यान सैन्यातील एक जवान जखमी झाला आहे व त्याच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. सुरक्षा दलाने या सर्व भागाला घेराव घातला आहे. तसेच सर्वत्र बारकाईने शोध मोहीम सुरू केली आहे.

विशेष म्हणजे आज पुलवामा जिल्ह्यातील कामराजीपोरा येथे सुरक्षा दलांना एक दहशतवादी ठार करण्यात यश आले आहे. कामराजीपोराच्या सफरचंद बागेत लपून बसलेल्या दोन दहशतवाद्यांची माहिती सुरक्षा दलालांना मिळाली होती. याअंतर्गत मोहीम राबवत सुरक्षा दलांनी कारवाई केली व या दरम्यान एक दहशतवादी ठार झाला तर सैन्यातील एक जवान देखील शहीद झाला.

मारल्या गेलेल्या दहशतवाद्याचे नाव आझाद अहमद लोण असे आहे. तो पुलवामाच्या लेल्हारचा रहिवासी होता. या चकमकीत सैन्याचा एक सैनिक शहीद झाला तर एक सैनिक जखमी झाला. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरूद्ध कश्मीर खोऱ्यात कारवाई सुरूच ठेवल्यामुळे दहशतवाद्यांना चांगलाच धक्का बसला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा