दिल्ली, २० फेब्रुवारी २०२३ : २००२ मध्ये दिल्लीच्या लाल किल्ल्यावर झालेल्या हल्ल्याचा दोषी लष्कर-ए-तय्यबाशी संबंधित पाकिस्तानी दहशतवादी आरिफ ऊर्फ अश्रफ याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. आरिफ सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद आहे. आता तिहार जेलने त्याला फाशी देण्याची तयारी केली आहे. म्हणूनच तिहार प्रशासनाने कनिष्ठ न्यायालयाला पत्र लिहिले आहे. जेणेकरून फाशीची तारीख निश्चित करून त्याचे डेथ वॉरंट जारी करता येईल.
२२ डिसेंबर २००२ रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर तैनात असलेल्या जवानांवर पाकिस्तानची दहशतवादी संघटना लष्कर-ए-तय्यबाच्या सहा दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. दहशतवाद्यांनी जवानांच्या बॅरेकवर अंदाधुंद गोळीबार केला. त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. यामध्ये तीन जवानांना प्राण गमवावे लागले. लाइट ॲण्ड साउंड शो पाहण्याच्या बहाण्याने सर्व दहशतवादी लाल किल्ल्यात घुसल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांच्या तपासात लष्कराचा संशयित दहशतवादी बिलाल अहमद याच्या खात्यात हवालाद्वारे २९.५० लाख रुपये ट्रान्सफर झाल्याचे आढळून आले. ही रक्कम मोहम्मद आरिफनेच हस्तांतरित केली होती. तो या हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. हा पैसा अशफाकने पाकिस्तानात बसलेल्या हँडलर्समार्फत हवालाद्वारे मिळविला. हा संपूर्ण पैसा जवानांच्या बॅरेकवर झालेल्या हल्ल्यात वापरण्यात आला.
त्याच वेळी या प्रकरणात पोलिसांनी दहशतवादी अशफाक अहमदसह इतर २१ जणांविरुद्ध २००१ मध्ये ट्रायल कोर्टात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयाने केवळ ११ जणांवर आरोप सिद्ध केले होते. ऑक्टोबर २००५ मध्ये पाकिस्तानी दहशतवादी अशफाकला फाशीची शिक्षा सुनाविण्यात आली होती. नजीर आणि त्याचा मुलगा फारूक या अन्य दोन दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनाविण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ओ. पी. सैनी यांनी अशफाकची पत्नी रेहमाना युसूफ फारुकी हिला दहशतवाद्यांना आश्रय दिल्याबद्दल दोषी ठरविले आणि तिला सात वर्षांची शिक्षा सुनावली. अन्य तीन आरोपींनाही न्यायालयाने ७ वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड