अमेरिका, २४ जुलै, २०२०: गुगलने स्मार्टफोनसाठी नवीन ऑपरेटिंग सिस्टिम अँड्रॉइड ११ च्या बिटा व्हर्जनची टेस्टिंग सुरू केली आहे.लवकरच हे अपडेट सर्व युजर्ससाठी रोल आउट केलं जाईल.
पण याबाबत एक महत्त्वाची माहती समोर आली आहे ती म्हणजे, २ GB किंवा त्यापेक्षा कमी रॅम असलेल्या स्मार्टफोनला अँड्रॉइड ११ चा सपोर्ट मिळणार नाही.मात्र आधीपासून असलेले २ जीबी रॅमचे जे डिव्हाइस जुन्या अँड्रॉइड व्हर्जनसह लाँच झाले होते, त्यांना या बदलाचा फटका बसणार नाही असं सांगितलं जात आहे.
XDA डेव्हलपर्स आणि जीएसएम-एरीनाच्या रिपोर्टनुसार, गुगलच्या डिव्हाइस कॉन्फिगरेशन गाइडची एक प्रत लीक झाली आहे. त्यानुसार, अँड्रॉइड ११ ओएससाठी किमान २ जीबी रॅम असणं आवश्यक आहे.
ज्या डिव्हाइसचा रॅम २ जीबीपेक्षा कमी असेल त्यावर अँड्रॉइड ११ काम करणार नाही. त्या डिव्हाइससाठी युजर्सना ‘अँड्रॉइड गो’ ओएसवर काम करावं लागेल.
याशिवाय, ५१२ MB रॅमसोबत येणाऱ्या डिव्हाइसना यापुढे प्री-लोडेड गुगल मोबाइल सर्व्हिसही मिळणार नाही. याचा थेट गुगलने या डिव्हाइससाठी सपोर्ट बंद केला असा निघतो.
न्यूज अनकट प्रतिनिधी