विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात ठाकरे गट थेट सुप्रीम कोर्टात

मुंबई, ३० सप्टेंबर २०२३ : आमदार अपात्रताप्रकरणात शिवसेना ठाकरे गटाने जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याविरोधात अॅफेडेव्हिट सादर केलं आहे.

शिवसेना आमदार अपात्र प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकावर ठाकरे गटाकडून तीव्र आक्षेप घेतला आहे. हे वेळापत्रक म्हणजे केवळ वेळकाढूपणा असल्याची टीका ठाकरे गटाने यापूर्वीच केली असून अध्यक्षांच्या या वेळकाढूपणा विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे.

विधानसभा अध्यक्ष अपात्रतेचा मुद्दा सोडून इतर विषयात वेळ घालवत असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते अ‍ॅड.अनिल परब यांनी केला आहे. ठाकरे गटाने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राचा मुद्दा ६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सुनावणीत मांडला जाणार आहे. सुनावणीत हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात मांडू असं अनिल परब म्हणाले आहेत. तसेच वेळापत्रक जाहीर करूनही विधानसभा अध्यक्ष परदेश दौऱ्यावर गेले आहेत. त्यावरही ठाकरे गटाने सडकून टीका केली आहे.

दरम्यान, राहुल नार्वेकर यांनी नुकतीच २५ सप्टेंबरला आमदार अपात्रतेप्रकरणी प्रत्यक्ष दुसरी सुनावणी घेतली. १४ सप्टेंबरला झालेल्या पहिल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणी दुसरी सुनावणी विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात पार पडली.

तर ठाकरे गटाकडून सर्व दाखल ३४ याचिका एकत्रित करून सुनावणी करा, अशी मागणी करण्यात आली. सर्व दाखल केलेली ३४ याचिका एकत्रित का केल्या जात नाहीत? अशी विचारणा त्यांनी केली. पण, सर्व याचिकांची एकत्रित सुनावणीला शिंदे गटाच्या वकिलांकडून विरोध करण्यात आला आहे शिंदे गटाचे वकील अनिल साखरे यांनी सर्व याचिका एकत्रित नको, स्वतंत्र सुनावणी घ्या, असा युक्तिवाद केला पण आता या प्रकरणात पुढील सुनावणी १३ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा