संजय राठोडांविरोधात ठाकरेंचा मास्टर प्लॅन; पोहरादेवीच्या महंतांना उतरवणार राजकारणात

मुंबई, १९ सप्टेंबर २०२२ : शिंदे गटातील मंत्री आमदार संजय राठोड यांना आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शह देण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दंड थोपटले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बंजारा समाजातील पोहरादेवीच्या महंताना शिवसेना पक्षाकडून तिकीट दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंड करून मुख्यमंत्री झाले यादरम्यान या बंडात सामील झालेले यवतमाळ चे आमदार संजय राठोड यांनी शिंदे गटाची वाट धरल्यामुळे अनेक बंजारा समाजातील मतदारांनी त्यांच्यावर निशाणा धरला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी संजय राठोड यांना मंत्रीपद दिल्यामुळे अनेक नेत्यांनी त्यांच्या वर आणि सरकारवर टीका केली आहे.

अलीकडच्या काळात महाविकास आघाडी च्या सरकार मध्ये संजय राठोड मंत्री असताना भाजपच्या काही नेत्यांनी त्यांच्यावर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप केले होते. पण त्यांना कोर्टाने क्लीनचीट दिल्यामुळे ते या प्रकरणातून मुक्त झाले आहेत. पण राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेना आता संजय राठोडां विरोधात मैदानात उतरणार आहे.

बंजारा समाजात पोहरादेवी हे मोठं दैवत असल्यामुळे तेथील मंदिरांच्या महंताना शिवसेनेत घेण्याचा उद्धव ठाकरे यांचा विचार असल्याची चर्चा सुरू आहे. तसेच लवकरच महंताना शिवबंधनात बांधणार आहेत. सूत्रांनी मिळालेल्या माहितीनुसार विधानसभेसाठी महंतांना तिकीट देणार असल्याची माहिती समोर आली आहे. संजय राठोड यांच्या विरोधात महंतांनी दंड थोपटले तर संजय राठोड यांच्या पुढे मोठं आव्हान होऊ शकतं. कारण पूजा चव्हाण प्रकरणानंतर तसेच शिंदे गटात गेल्यानंतर राठोडा़वर बंजारा मतदार नाराज झाल्याच्या चर्चा आहेत. त्याचबरोबर यवतमाळ मतदार संघात पोहरादेवी ला मानणारा वर्ग मोठा असल्यामुळे मतांची विभागणी झाली तर संजय राठोड यांना मोठा फटका बसणार आहे. तर उद्धव ठाकरे यांच्याकडून कोणती मोठी पावले उचलली जाणार याकडे लक्ष असणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा