‘ठाकरे’ नव्हे, महाराष्ट्र सरकार म्हणा : नारायण राणे

नागपूर : ‘ठाकरे सरकार’ या शब्दप्रयोगाला नारायण राणे यांनी आक्षेप घेतला आहे. हे अधिवेशन महाराष्ट्र सरकारचे आहे. त्याला कोणाचे नाव जोडू नका, असे त्यांनी सांगितले आजे.
नव्या सरकारचे अधिशवेशन हे अधिवेशन असल्यासारखे वाटत नसून घरगुती कार्यक्रम वाटत आहे, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.
शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे पहिलेच अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राणेंनी सरकारवर टीका केली आहे.
यावेळी राणे म्हणाले की, हे अधिवेशन महाराष्ट्र सरकारचे आहे. त्याला कोणाचेही नाव जोडू नका. तसेच सत्ताधाऱ्यांकडून कुठलीही गोष्ट नियमाला धरून होत नाही. त्यामुळे हे अधिवशेन असल्यासारखे वाटत नाही.असेही राणे यांनी सांगितले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा