‘ठाकरे’ यांच्या मंत्रिमंडळात कुणाची लागणार वर्णी?

मुंबई: तीन दिवसातच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार कोसळल्यानंतर महाविकास आघाडीला सत्तास्थापनेच राज्यपालांनी आमंत्रण दिले. त्यानंतर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे.
तत्पूर्वीच कोण-कोण नेते उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात असणार, याबद्दल चर्चा सुरू आहेत. या मंत्रिमंडळात तिन्ही पक्षातील काही नेत्यांची नावे आघाडीवर आहेत.
महाविकास आघाडीचे मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला असून सेनेला १६ मंत्रिपद, राष्ट्रवादीला १४ व काँग्रेसला १२ मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

यांच्या नावाची चर्चा

शिवसेना : दिवाकर रावते, सुभाष देसाई, अब्दुल सत्तार, रामदास कदम, तानाजी सावंत, दीपक केसरकर व गुलाबराव पाटील.

राष्ट्रवादी : धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, दिलीप वळसे, मकरंद पाटील व राजेश टोपे.

काँग्रेस : अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, के.सी. पडवी, विश्वजित कदम, यशोमती ठाकूर, सतेज पाटील व सुनील केदार आदी नेत्यांची नावे चर्चेत आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा