थंडीतला पाऊस की पावसातली थंडी

पुणे तिथे काय उणे म्हणणाऱ्या पुण्यात पावसाने देखील दाखवून दिले की, मी सुद्धा कमी नाही . गेल्या २४ तासात पुण्यात पावसाने रेकॅार्ड ब्रेक केले असून, पाऊसधार, धुके आणि थंडी यांचा एकत्र मेळ पुण्यात पहायला मिळाला. पुणेकरांना पुन्हा एकदा थंडीचा सामना करावा लागला. सततच्या पावसामुळे २४ अंशावरून पारा थेट १० अंशावर घसरला .
डिसेंबर महिन्यात पाऊस ही घटना तब्बल सहा वर्षानंतर घडली. २०१४ नंतर पुन्हश्च एकदा पावसाने डिसेंबर महिन्यात हजेरी लावली होती. राज्यात सगळीकडे पावसाने हजेरी लावल्याने सगळ्यांची तारांबळ उडाली होती. मुंबई, मराठवाडा, सातारा , सांगली, कोल्हापूर, नाशिक, रायगड, पालघर, रत्नागिरीत पावसाने थैमान घातले. अवकाळी पावसाने मासेमारीवर परिणाम झाला . कृषि क्षेत्राबरोबर पर्यावरणावर परिणाम झाला. कांदा, स्ट्रॅाबेरी, द्राक्षे यांसारख्या पिकांवर परिणाम झाल्याने ही पिके महागणार आणि पुन्हा सर्वसामांन्यांना याची झळ पोहोचणार हे नक्कीच.
आरोग्यक्षेत्रात पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढत असताना संसर्गजन्य आजार वाढण्याती शक्यता आरोग्यविभागाकडून वर्तवली जात आहे. पावसाचा फायदा रिक्षावाले आणि कॅग ड्रायव्हर यांनी जास्त प्रमाणात उचलला. अवाच्या सवा भाडी आकारुन पुणेकरांना त्याचा वेगळा त्रास सहन करावा लागला.
३ डिसेंबरला आकाश ढगाळ राहणार असून ४ आणि ५ डिसेंबरला पाऊस ओसरेल असा अंदाज हवामानखात्याकडून वर्तवला जात आहे. आता पाऊस कोणाकोणाला लाभदायक ठरतोय आणि कोणाला नुकसानकारक हे पाहणं औक्सुक्याचं ठरणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी -तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा