कोरोनावरील इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांचा ठाणे पोलिसांनी लावला शोध

ठाणे, दि. २३ जुलै २०२०: गेल्या काही दिवसांपासून कोरोनावरील इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याच्या चर्चा ठाणे जिल्ह्यात सुरू होत्या. मात्र या चर्चा नसून खरच या गोष्टी घडत होत्या. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मंगळवारी याचा शोध लावला. कोरोनावरील जीवनरक्षक ठरलेल्या औषधांचा प्रचंड तुटवडा मुंबई ठाण्यात जाणवत होता. त्यातच टोकलीझुमॅब आणि रेमडिसिविर हे इंजेक्शन काळया बाजारामध्ये चढया दराने विक्री करणाऱ्यांना विक्रेत्याला आणि आणखीन पाच जणांना दोन रेमडिसिविरसह आठ लाखांचा मुद्देमालासह पकडण्यात आले आहे.

या प्रकरणी औषध निरीक्षक वीरेंद्र रवी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नौपाडा पोलीस ठाण्यात कलम ४२० तसेच औषध किंमत नियंत्रण आदेश तसेच जीवनावश्यक वस्तू अधिनियमासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आाहे.

अरुण सिंग हे या विक्रेत्याच नाव आहे. ४० हजारांना विक्री किंमत असलेल्या टोकलीझुमॅब या इंजेक्शनची ८० हजारांमध्ये तर तीन हजारांमध्ये मिळणाऱ्या रेमडिसिवीरची थेट आठ पटीपेक्षा जास्त म्हणजे २५ हजारांमध्ये विक्री होत होती. इंजेक्शनची विक्री करण्यासाठी हे ठाण्यातील तीन पेट्रोल पंप येथे येणार असल्याची माहिती खंडणी विरोधी पथ्काला मिळाली होती.

याच माहितीच्या आधारे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोथमिरे यांच्या पथकाने ही कारवाई केली. कोणाचीही या औषधांबाबत जर फसवणूक झाली असेल त्या नागरिकांनी खंडणी विरोधी पथकाकडे ०२२- २५३४८३३६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राजश्री वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा