ठाणेच्या महापौरपदी शिवसेनेचे नरेश म्हस्के

ठाणे : राज्यामध्ये विधानसभेची निवडणूक होऊन महिना झाला. तरी सत्ता स्थापनेचा तिढा अजूनही सुटलेला नाही. परंतु दुसऱ्या बाजूला महापौरपदासाठी निवडणुका सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर आज ठाण्यामध्ये महापौरपदाची निवड पूर्ण झाली.
ठाणे हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे. या बालेकिल्ल्यावर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकला आहे. ठाण्यामध्ये नरेश मस्के यांची महापौरपदी निवड करण्यात आली आहे. तर पल्लवी कदम यांची उपमहापौरपदी निवड झाली आहे.

त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे ठाणे महापालिकेमध्ये उपस्थित होते. ठाण्यातल्या सगळ्या नेतेमंडळींनी आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांचे जोरदार स्वागत केले. ठाण्यातले आमदार प्रताप सरनाईक त्याचबरोबर रवींद्र फाटक आणि शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे हे देखील यावेळी उपस्थित होते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा