गोल पोस्ट व्हिडिओ संभाजी भिडे यांचे ते वक्तव्य म्हणजे नालायकी,बच्चू कडू यांनी व्यक्त केला संताप

संभाजी भिडे यांचे ते वक्तव्य म्हणजे नालायकी,बच्चू कडू यांनी व्यक्त केला संताप

अमरावती, १ जुलै २०२३ : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी दोन एक दिवसांपुर्वी वंदे मातरम गीत तुमचे आमचे राष्ट्रगीत नाही, तर रवींद्रनाथ टागोर यांनी ‘जन गण मन’ हे गीत सुचले असे वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर त्यांच्याविरोधात आता राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहे.

याचदरम्यान त्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार छगन भुजबळ यांनी भिडे यांना अटक करावी अशी मागणी केली. अनेक संघटनांनी देखील या विधानाचा निषेध केला होता. त्यानंतर आता प्रहार संघटनेचे नेते आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी देखील संपात व्यक्त केला आहे.

यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले असेच जर वक्तव्य एखाद्या परधर्मीयांना किंवा दुसऱ्या धर्मातल्या माणसाने केले असते तर आतापर्यंत लोकांनी तांडव केला असता. पण असे वक्तव्य भिडे यांनी केले आहे. त्याचे हे वक्तव्य म्हणजे देशद्रोहच आहे. तर असे वक्तव्य करणे हे नालायकी आहे अशी घणाघाती टीका बच्चू कडू यांनी केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

error: Content is protected !!
Exit mobile version