नितीश राणेंकडून ‘तो’ व्हिडिओ ट्विट; म्हणाले…

5

मुंबई, २ जानेवारी २०२३ अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून २०२० रोजी घडी गलफास आत्महत्या केली. ही घटना घडून अडीच वर्षांहून अधिक लोटला आहे. परंतू ही आत्महत्या होती की हत्या हे कोडे काही अजून सुटलेले नाही. त्यातच भाजपचे नितेश राणे यांनी आज सुशांतचा मृतदेह नेतानाचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.
https://twitter.com/NiteshNRane/status/1609749000017838082?s=19

नितेश राणे आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात की, ‘रुपकुमार शहा सुशांत सिंग राजपूतचा मृतदेह घेऊन जात होते, हे स्पष्ट दिसत आहे. त्याच्या शवविच्छेदनाच्या वेळीही शहा तिथे उपस्थित होते. सत्य आता समोर येत आहे. आता बेबी पेंग्विन लांब नाही. आता न्याय तर होणारच आहे.

काय म्हणाले होते रुपकुमार शहा ?

नुकताच रुपकुमार शहा यांनी दावा केला होता की, सुशांत सिंहची आत्महत्या नाही तर हत्या होती. कारण मी जेव्हा सुशांतचा मृतदेह पहिला होता त्यावेळी त्यांच्या शरिरावर दुखापतीचे व्रण होते. त्यामुळे ती हत्या असण्याची शक्यता आहे.

या ट्वीटमधून नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांचा बेबी पेंग्विन असा उल्लेख करत त्यांना इशारा दिला आहे. दरम्यान, नितेश राणे यांनी ट्विटमध्ये, शवविच्छेदनाच्या वेळी शहा तिथे उपस्थित होते, असे म्हटले आहे.

दरम्यान, नुकताच सुशांतची मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यूचा मुद्दा हिवाळी अधिवेशनादरम्यान चर्चेत आला होता. तर सुशांतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेणारा रुग्णालयातला कर्मचारी रुपकुमार शहा यांनी समोर येत सुशांतच्या मृत्यूविषयी खुलासा केला होता.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा