गोल पोस्ट गुन्हा जन्मदात्यानंच १४ वर्षाच्यामुलीला ४ लाखात विकलं, झाले अनेकदा बलात्कार…

जन्मदात्यानंच १४ वर्षाच्यामुलीला ४ लाखात विकलं, झाले अनेकदा बलात्कार…

उज्जैन, १५ डिसेंबर २०२०: मध्यप्रदेश मधे एका नराधम बापानं आपल्या १४ वर्षाच्या मुलीला चार लाखात विकून टाकलं. एव्हढंच नव्हेतर त्यानं तिचं त्या व्यक्ती बरोबर बळजबरीनं लग्न ही लावून दिलं.

या प्रकरणात उज्जैन पोलिसांनी मुलीचे वडील, उदयपुरातील आणखी एक पुरुष आणि उज्जैनमधील दोन महिलांसह चार जणांना अटक केली. आयपीसी, लैंगिक गुन्हेगारापासून संरक्षण कायदा आणि बाल विवाह प्रतिबंध कायदा संबंधित कलमांतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.

याप्रकरणी उज्जैनचे एस पी म्हणाले की, “उज्जैन येथील रहिवासी असलेल्या मुलीला नोव्हेंबरमध्ये तिच्या पालकांनी उदयपूर इथं नेलं होतं. तिचं लग्न होणार असल्याचं पालकांनी तिला सांगितलं. मुलीनं आक्षेप घेतला पण, तिच्या वडिलांनी २४ नोव्हेंबर रोजी उदयपूर जिल्ह्यातील एका खेड्यात तिच्या लग्नाचं औक्षण केलं. मुलीचं बेकायदेशीर लग्न लावून दिल्यानंतर मुलीला पती पाशी सोडून पालक पुन्हा उज्जैनला आले.”

एसपींनी पुढं सांगितलं की, “त्या व्यक्तीनं मुलीवर अनेकवेळा बलात्कार केला आणि तिला सांगितलं की, तिच्या आई-वडिलांनी तिला चार लाखात विकलं आहे. ८ डिसेंबर रोजी मुलीनं शेवटच्या वेळी तिच्या आईवडिलांना भेटण्यासाठी तिला उज्जैनला घेऊन जाण्यास सांगितलं, त्यानंतर त्या व्यक्तीनं तिला उज्जैन येथे आणलं. रविवारी त्यानं तिला परत उदयपुरात नेण्याचा प्रयत्न केला पण, तिनं तिच्या काकूशी संपर्क साधला आणि तिच्यासोबत घडलेला प्रकार तिच्या काकू ला सांगितला.”

पीडित मुलीच्या काकूंनी चाइल्डलाइन आणि पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली असून मुलीला समुपदेशनसाठी पाठविण्यात आलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

error: Content is protected !!
Exit mobile version