गोल पोस्ट इतर सरकारी योजना ‘पीएम किसान’चा १४ वा हप्ता “या” तारखेला होणार जमा

‘पीएम किसान’चा १४ वा हप्ता “या” तारखेला होणार जमा

नवी दिल्ली, १२ जून २०२३: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा १४ वा हप्ता लवकरच देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. जून अखेरपर्यंत हा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांना मिळेल. आतापर्यंत पात्र लाभार्थ्यांना १३ हप्ते केंद्राकडून मिळाले आहेत.

२७ फेब्रुवारीला जवळपास ८ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळाला होता. योजनेनुसार देशभरातील शेतकऱ्यांना वर्षभरात प्रत्येकी तीन हप्त्यांमध्ये दोन हजार रुपायांचा निधी दिला जातो. जून मध्ये हप्ता वळता केल्यानंतर दिवाळीपूर्वी १५ वा, जानेवारीत १६ वा आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मार्च, एप्रिल दरम्यान १७ वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा केला जाईल, असे सांगण्यात आले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version