भारत आणि चीनमधील चर्चेची 14वी फेरी अनिर्णित, पुन्हा चर्चा होणार

नवी दिल्ली, 14 जानेवारी 2022: भारत आणि चीन यांच्यातील तणाव इतक्या लवकर संपणार नाही. दोन्ही लष्करांमधील चर्चेची 14वी फेरी पुन्हा एकदा निष्फळ ठरलीय. 13 तासांहून अधिक काळ चाललेल्या बैठकीत, दोन्ही बाजूंनी जवळचा संपर्क कायम ठेवण्यास आणि उर्वरित मुद्द्यांवर लवकरात लवकर परस्पर स्वीकारार्ह तोडगा काढण्यासाठी चर्चा सुरू ठेवण्याचं मान्य केलंय. दोन्ही देशांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय की, बैठकीत हॉट स्प्रिंग, डेपसांग आणि डेमचोक भागातून भारतीय बाजूने सैन्य मागं घेण्यावर भर देण्यात आला.

दोन्ही बाजूंनी पश्चिम सेक्टर (लडाख सीमेवरील) वास्तविक नियंत्रण रेषेवरील (एलएसी) संबंधित समस्यांच्या निराकरणावर खुले आणि सखोल विचारांची देवाणघेवाण केली, असं निवेदनात म्हटलं आहे. निवेदनात असेही म्हटलंय की दोन्ही बाजूंनी दोन्ही देशांच्या नेत्यांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचं पालन केलं पाहिजे आणि उर्वरित समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी कार्य करावं यावर त्यांनी सहमती दर्शविली.

संयुक्त निवेदनात असं नमूद करण्यात आलंय की यामुळे पश्चिम क्षेत्रातील एलएसीसह शांतता आणि स्थिरता पुनर्संचयित करण्यात आणि द्विपक्षीय संबंध सुधारण्यास मदत होईल. त्यात म्हटलंय की, दोन्ही बाजूंनी भूतकाळातील निकालांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी आणि हिवाळ्याच्या हंगामातही पश्चिम क्षेत्रातील जमिनीवर सुरक्षा आणि स्थिरता राखण्यासाठी प्रभावी प्रयत्न केले जातील.

त्याच वेळी, दोन्ही बाजूंनी घनिष्ठ संपर्क राखण्यासाठी आणि लष्करी आणि राजनैतिक माध्यमांद्वारे चर्चा सुरू ठेवण्याचं आणि उर्वरित समस्या लवकरात लवकर सोडवण्याचं मान्य केलं आहे.

50,000 हून अधिक सैन्य तैनात

गेल्या मे महिन्यात लडाखमध्ये तणाव सुरू झाल्यापासून या प्रदेशात 50,000 हून अधिक सैन्य तैनात करण्यात आलेत. लडाखच नाही तर अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीमच्या सीमेला लागून असलेल्या पूर्वेकडील भागात चीन गेल्या एक वर्षात आक्रमक पावले उचलत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा